Wednesday, 1 February 2017

गुमास्ता लायसन्स देण्यासाठी लाच घेणाऱ्या शॉपऍक्ट इन्स्पेक्टरला सश्रम कारावास व दंडाची शिक्षा



मुंबई -
मुंबई येथील दुकानाच्या गुमास्ता लायसन्ससाठी २००० रुपये लाच मागणाऱ्या सविता मानकर या शॉप ऍक्ट इन्स्पेक्टरला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १००० रुपये लाच घेताना दि 21/06/2014 रोजी सापळा रचून रंगेहाथ पकडले होते , त्या खटल्याचा निकाल नुकताच लागला , याप्रकरणी आरोपीवर गुन्हा शाबीत झाल्याने विशेष सत्र न्यायाधीश एम के महाजन , सत्र न्यायालय मुंबई यांनी कलाम ७ अन्वये १ वर्ष सश्रम कारावास व १० हजार दंड तर कलाम १३ अन्वये १ वर्ष सश्रम कारावास व १० हजार दंड अशी शिक्षा लोकसेवक सविता मानकर पूर्व शॉप ऍक्ट इन्स्पेक्टर याना सुनावली , सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक मुलाणी यांनी केला तर सरकारतर्फे सरकारी वकील देसाई यांनी काम पाहिले
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे या निकालाची माहिती देण्यात आली आहे

तसेच भ्रष्टाचार व  कोणत्याही कामासाठी लाच मागितली जात असल्यास त्याची त्वरित १०६४ या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे


0 comments:

Post a Comment