तक्रारदार शिवाजी देसाई रा घानवडे ता करवीर याने बोगस बांधकाम परवाना, फाळा पावतीसह अन्य कागदपत्रे ग्रामसेवकाचा मदतनीस सागर शामराव सावंत याच्या संगनमताने बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या घानवडे ग्रामसेवकांनी नोंव्हेेबर 2016 मध्ये शिवाजी देसाई, सागर सावंतविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता ,या फसवणुकीच्या गुन्ह्यातील तपासात मदतीच्या बहाण्याने डॉक्टराच्या मध्यस्थीने दहा हजार रुपयांची लाच करवीर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार
जावेद गुलाव सय्यद (वय 48, रा. पोलिस मुख्यालय, कोल्हापूर) याने तक्रारदाराकडे मागितली होती ,
तपासात मदत करतो,असे सांगून त्याने देसाईकडे 25 हजार रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाशी संपर्क साधून हवालदार व डॉक्टरविरुद्ध तक्रार दाखल केली.
करवीर पोलीस ठाण्यात तक्रार ग्रामसेवकाने बोगस कागदपत्रांबाबत देसाईविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर शिरोली दुमाला परिक्षेत्राचे पोलीस हवालदार जावेद सय्यद यांच्याकडे तपासाचे काम होते. सय्यद याने डॉ शत्रुघ्न जाधव या मध्यस्थामार्फत तक्रारदारांकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
लाचेची मागणी करणार्या हवालदार जावेद सय्यदला येथील करवीर पोलिस ठाण्यात ड्युटीवर असताना दुपारी एसीबीकडून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या सूचनेनुसार तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना मध्यस्थी डॉ. जाधव यालाही ताब्यात घेण्यात आले, असे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले. दोघांविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर येथे अथवा हेल्पलाईन क्र. 1064 वर संपर्क साधावा , असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , कोल्हापुर यांच्यावतीने करण्यात आले आहे
0 comments:
Post a Comment