Thursday, 23 February 2017

कोल्हापुरात अवैध मद्य वाहतूक करताना एकाला पकडले - सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधि - सर्जेराव पोवार 
आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निकालाच्या पार्शवभूमीवर कोल्हापूर शहर डीवायएसपी भारतकुमार राणे हे आपल्या सहकाऱ्यांसह पेट्रोलिंग करत असताना दुपारी दोनच्या सुमारास मारुती ओम्नी व्हॅन ला अडवून तिची तपासणी केली असता विनापरवाना अवैध मद्य साठा आढळून आला , या करिता पोलिसांनी चालक अजय गुलाबराव खानविलकर वय ४९ रा समृद्धी कॉम्प्लेक्स ,तपोवन शाळेजवळ , कोल्हापूर यास ताब्यात घेत अटकेची कारवाई केली यावेळी पोलिसांनी मारुती व्हॅन MH09 BM 3988 सह 141574 रु मद्य साठा जप्त केला आहे , या कारवाईत कोल्हापूर शहर डीवायएसपी भारतकुमार राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो कॉ मुन्ना कुडची,जमीर मुल्ला ,संदीप कापसे यांनी भाग घेतला

0 comments:

Post a Comment