Tuesday, 14 February 2017

ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी.पाटील यांची इनोव्हा गाडी कोल्हापुरातुन राहत्या घरासमोरुन चोरीला

प्रातिनिधिक चित्र 

प्रतिनिधी - संदीप पोवार

काल रात्री पश्चिम महाराष्ट्रातील थोर विचारवंत व जेष्ठ नेते प्रा.एन.डी.पाटील यांची इनोव्हा कार रुईकर कॉलनीतील त्यांच्या राहत्या घरासमोरून चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.याबाबतची फिर्याद आज दुपारी शाहूपुरी पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे.काल रात्री रुईकर कॉलनीतील त्यांच्या घरासमोर पार्क केलेली गोल्डन रंगाची टोयोटा इनोव्हा रजि.क्र.MH09 BX 6929 मॉडेल 2012 हि कार  अज्ञात चोरट्याने डुप्लिकेट चावीचा वापर करून, काच फोडून नेली आहे असा गुन्हा दाखल केला आहे , पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि देशमुख करत आहेत


0 comments:

Post a Comment