अहमदनगरमध्ये जेऊर गटातील पांगरमल गावात पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारात शिवसेनेच्या उमेदवारानं मतदारांना पार्टी दिल्याचं नागरिकांनी सांगितलं ,
पार्टीमध्ये फुकटची अति दारु प्यायल्यामुळे राजेंद्र आंधळे, पोपट आव्हाड, दिलीप आव्हाड यांचा मृत्यू झाला आहे, तर आदिनाथ आव्हाड, राजेंद्र आव्हाड आणि रावसाहेब आव्हाड अत्यवस्थ असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रात्री मतदारांना पार्टी देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यांना त्रास होऊ लागला. पार्टीत बनावट दारुच्या अतिसेवनानं मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
निवडणुकीची बनावट दारु गावकऱ्यांच्या जीवावर बेतली आहे. अतिमद्यसेवनामुळे तिघांचा बळी गेला आहे, तर तिघं जण अत्यवस्थ आहेत.यामुळे नागरिकांमध्ये राजकारण्यांबद्दल कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे ,
या प्रकरणी पोलीसांनी नातेवाईकांच्या तक्रारीवरुन राजकीय कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आलं असून चौकशी सुरु आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं अहमदनगर पोलीस अधीक्षकांनी म्हटलं आहे.
0 comments:
Post a Comment