प्रतिनिधी - संदीप पोवार
शिवजयंती मिरवणुकीत डाॅल्बी लावल्या प्रकरणी संयुक्त कसबा बावडा मंडळावर काल रात्री उशिरा शाहुपूरी पोलीसांनी कारवाई केली.
काल रात्री संयुक्त कसबा बावडा मंडळाने डाॅल्बी परवानगी नसताना सुद्धा मोठ्या आवाजात डॉल्बी लावून मिरवणूक काढली होती.
शाहुपूरी पोलिस ठाण्यातील पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी मंडळातील कार्यकर्त्यांना डाॅल्बी बंद करा अशा वारंवार सुचना देऊन सुध्दा मंडळातील कार्यकर्ते ऐकत नव्हते
म्हणून रात्री साडे अकराच्या सुमारास भगवा चौक येथे त्यांनी आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांना डाॅल्बी जप्त करण्याचे आदेश दिले.
त्या आदेशानुसार पोलिसांनी डाॅल्बी जप्त करत असताना ट्रॉली तेथेच ठेऊन ट्रॅक्टर घेऊन मंडळातील काही कार्यकर्ते निघून गेले.
काही वेळाने स्वतः पोलिसांनी वाहनाची व्यवस्था करून डाॅल्बी नेत असताना कार्यकर्ते वाहनाच्या समोर बसून राहिले असता पोलिसांना थोडा लाठीमार करावा लागला
आणि त्यांनी डाॅल्बी शेवटी जप्त करून पोलिस ठाण्यात आणून लावला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते.

