प्रतिनिधी सर्जेराव पोवार
पोलीस महासंचालक कार्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या मानवी हक्क आयोग वादविवाद स्पर्धेत उपअधिक्षक हर्ष पोद्दार यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांना सलग दुसरया वर्षी सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे गुरुवारी स्पर्धेचे आयोजन केले होते. हया स्पर्धेसाठी राज्यातून 36 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत हर्ष पोद्दार यांनी कोल्हापूर पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व केले. यांनी वादविवाद स्पर्धेत उत्कृष्ठपणे विचार मांडले. हर्ष पोद्दार यांना पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील ,पोलीस अधिक्षक महादेव तांबडेसो यांचे माग॔दश॔न लाभले.
0 comments:
Post a Comment