Wednesday, 26 April 2017

कोल्हापूरात पावणे दोन लाखांच्या मोबाईल उधारीवरुन जीवे मारण्याची धमकी

प्रतिनिधी : सर्जेराव पोवार

कोल्हापूरात मोबाईल उधारीवरुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या विरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
वल्लभ जमखंडीकर वय 19(रा. देवकर पाणंद, कोल्हापूर) या संशयिताचे विरुद्ध विश्वजित पाटील वय  26 (रा. सडोली खालसा, सध्या गीतगोविंद अपार्टमेंट, साईक्स एक्स्टेंशन, राजारामपुरी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. 
विश्वजित पाटील यांचे राजारामपुरीतील पहिल्या गल्लीत मोबाईल विक्रीचे दुकान आहे.
वल्लभ जमखंडीकर आणि त्याच्या पत्नीने मार्च  व एप्रिल महिन्यात पाटील यांच्या दुकानातील कामगाराच्या ओळखीने सुमारे 1 लाख 75 हजारांचे सॅमसंग कंपनीचे मोबाईल उधारीवर नेले होते आणि  त्यापोटी 1,75,450 रुपयांचा चेक दिला होता. दिलेल्या तारखेला चेक वटला नाही. त्यामुळे पाटील यांनी जमखंडीकर यांच्याकडे पैसे मागितले असता जमखंडीकर आणि त्याच्या पत्नीने पैसे मागितले म्हणून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पाटील यांनी वल्लभ जमखंडीकर विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात  फसवणूक करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद आजरोजी दि 25 एप्रिलला दिली आहे.

0 comments:

Post a Comment