युरोपसह जगातील 99 देशामध्ये कॉम्प्युटर व्हायरस हल्ला झाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे, हॉस्पिटल, शिक्षण संस्था, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यासह अनेक सरकारी व खासगी कार्यालयात रॅन्समवेअर या व्हायरसचा हल्ला झाला आहे.
सायबर हल्ल्यासाठी रॅन्समवेअर नावाच्या व्हायरसचा वापर केला असल्याचं म्हटलं जात आहे. रॅन्समवेअर हा एक असा व्हायरस आहे की जो तुमच्या कॉम्प्युटर्स फाइल डिलीट करण्याची धमकी देतो. त्यासोबत अशीही धमकी दिली जाते की, जर तुमच्या फाइल वाचवायच्या असतील तर त्यासाठी पैसे द्या.
जपान, तैवान व चीनकडून या व्हायरसला थोपवण्याकरता विशेष काळजी घेतली जात आहे,
अद्याप भारतात व आशिया खंडात या व्हायरसचा हल्ला झाला नसला तरी प्रत्येकाला आपल्या कॉम्प्युटरवर अॅण्टी व्हायरस वापरून काळजी घेतली पाहिजे.
Saturday, 13 May 2017
- Home
- Unlabelled
- युरोपसह 99 देशात रॅन्समवेअर व्हायरसचा हल्ला, कॉम्प्युटर कामकाज ठप्प
युरोपसह 99 देशात रॅन्समवेअर व्हायरसचा हल्ला, कॉम्प्युटर कामकाज ठप्प
Posted By CRIME DIARY
On 16:10
0 comments:
Post a Comment