प्रतिनिधी - संदीप पोवार
कोल्हापूर : शाहू सांस्कृतिक भवन (मार्केट यार्ड) येथे दि.23 रोजी फणस विक्रेत्याच्या खून झाला होता या प्रकरणाचा तातडीने तपास करून आरोपीला अटक करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले आहे. आरोपी किरण भगवान मोहिते ( वय ३०) रा. तावडे हॉटेल नजीकच्या झोपडपट्टी याच्या मुसक्या आवळल्या आहेत .
या प्रकरणी क्राइम डायरी प्रतिनिधीला माहिती देताना शाहुपूरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी सांगितले कि
किरण मोहिते हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडीचे व मंदिर दानपेट्या फोडीचे गुन्हे दाखल आहेत.
तो व त्याची बायको पूजा (वय २५) हे भंगार व बाटल्या गोळा करण्याचे काम करतात
ते दोघे मार्केट यार्ड परिसरात २२ रोजी दुपारी १२ च्या सुमारास फिरत असताना फणस खरेदीसाठी केरबा कांबळे (वय ५०) रा. शेणवडे ( ता. गगनबावडा) यांच्याकडे गेले फणसाच्या किमतीवरून त्यांच्यात वाद झाला. कांबळे यांनी त्यांचे मळलेले कपडे बघून त्यांना भिकारी समजून त्याला शिवीगाळ केली. याच्या रागातून मोहिते याने रात्री फुटपाथवर झोपलेल्या केरबा कांबळे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली.
यानंतर पोनि प्रविण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय गेंजगे व पो नाईक मुल्ला यांनी हा परिसर पिंजून काढत खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार किरणला अटक केली.त्याला पोलीस स्टेशनला आणुन कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या खुनात आपली पत्नी पूजाही सामील असुन आपण दोघे एकत्र जाउन मृताच्या डोक्यात दगड घालून खुन केला असे सांगितले.
0 comments:
Post a Comment