– वाहनात पेट्रोल भरताना आपले लक्ष डिस्पेन्सरमध्ये वेगाने फिरणाऱ्या लीटरच्या आकड्याकडे असते, त्यानुसारच आपण पैसे भरतो. पण या मशीनच्या आत इलेक्ट्रॉनिक उपकरण बसवून दर वेळी १० टक्के कमी पेट्रोल देऊन ग्राहकांना लुटण्याचा प्रकार उत्तर प्रदेशात उघडकीस आला आहे. या पेट्रोल चोरीमुळे दरवर्षी ग्राहकांना २५० कोटी रूपयांचा चुना लावला जात आहे!
उत्तर प्रदेश एसटीएफने सात पेट्रोल पंपांवर धाडी घातल्या. या सर्व ठिकाणी पेट्रोल चोरींसाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बसवण्यात आल्याचे आढळले.
महाराष्ट्रातही असे पेट्रोल पंप ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक चीप बसवून काटामारिने दररोजच लुटत असतात, कित्येकदा सुज्ञ नागरिकांनी याविरुद्ध आवाज उठविला आहे, सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, सरकारने याची जराही दखल घेतली नाही कारण पंपमालकांनी ज्या पद्धतीने पंपामधील फेरफार मॅनेज केला आहे तसेच सरकारी बाबूंनाही मॅनेज केले आहे अशी चर्चा नागरिक करीत आहेत.
0 comments:
Post a Comment