Friday, 10 March 2017

खरेदीच्या बहाण्याने आलेल्या तिघांनी दुकानदार महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली

प्रतिनिधी - संदीप पोवार
दि १०/०३/०२०१७ रोजी कोल्हापूर पाटोळेवाडी येथे सायंकाळी ६ च्या दरम्यान खरेदीच्या बहाण्याने आलेल्या तिघांनी दुकानदार महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली.
रुपाली प्रशांत पाटोळे वय ३४ रा पाटोळेवाडी,कोल्हापूर हि महिला महालक्ष्मी किराणा स्टोअर्स येथे दुकानात असताना मोटारसायकलवरून ३ अनोळखी व्यक्ती आल्या पैकी एकजण दुकानात येऊन चिंगम मागितले ,रुपाली या युवकास चिंगम देत असताना त्यांच्या गळ्यातील सोनसाखळीला जोरदार हिसडा मारून त्याने पलायन केले व दुकानाच्या दारात सुरु असलेल्या मोटारसायकलवरून तिघेजण पळून गेले
अंदाजे ५ ग्राम वजनाची सोनसाखळी किंमत १४००० रु अनोळखी तरुणांनी पळवून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलिसात नोंद झाली आहे पुढील तपास पोनि प्रवीण चोगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि देशमुख करत आहेत 

0 comments:

Post a Comment