Sunday, 12 March 2017

कोल्हापूर-रत्नागिरी बसमध्ये चढताना महिलेची पर्स चोरीला - मोबाईल व रोख रक्कम असा एक लाख रुपयांचा ऐवज लंपास



प्रतिनिधी - संदीप पोवार

        वर्षा शहाजी देठे हि महिला शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर-रत्नागिरी बसमध्ये बसताना  त्यांची पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले.  शनिवारी दुपारी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात कोल्हापूर-रत्नागिरी एस.टी. बसमध्ये हा प्रकार घडला.एस. टी. बसमध्ये सीट मिळवण्यासाठी खिडकीतून सीटवर ठेवलेली पर्स चोरट्याने लंपास केली. पर्समधील सोन्याचा नेकलेस, गंठण व नथ, मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.
  वर्षा शहाजी देठे (रा. मूळ पंढरपूर, सध्या देवरूख, ता. संगमेश्‍वर, रत्नागिरी) यांनी शाहूपुरी पोलिसांत तक्रार दिली आहे.

0 comments:

Post a Comment