Saturday, 11 March 2017

भिवंडीत आंतरराज्यीय दरोडेखोरांची टोळी जेरबंद, ८५ लाखांच्यावर मोबाईल, लॅपटॉपचे साहित्य जप्त.

भिवंडी दि.१० ( वेंकटेश रापेल्ली  ) तालुक्यातील कोनगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळास व रांजणोली गावतील गोदामातून आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीने तब्बल 85 लाख 32 हजार 682 रुपयांचे डेल कंपनीचे लॅपटॉप व 86 आयफोन कंपनीचे मोबाईल लंपास केल्याची घटना घडली होती. याचा चोरीचा कोनगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करून या गुन्ह्यातील 10 दरोडेखोरांना जेरबंद करीत त्यांच्याकडून चोरीला गेलेले मोबाईल आणि लॅपटॉप साहित्य जप्त करीत या गुन्ह्यात वापरलेले दोन वाहनही जप्त करण्यात आल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. भिवंडीच्या ग्रामीण परिसरात शेकडो गोदामे असून या गोदामात लाखोंच्या संख्येने कामगार काम करीत आहेत. अश्याच पिंपळास गावातील प्रों.कनेक्ट सप्लाय सोलुसन्स लिमिटेड कंपनीच्या गोदामातून 10 जानेवारी 2017 रोजी रात्रीच्या सुमाराला गोदामातील वाचमन राजकुमार बेहरा याचे हातपाय बांधून गोदामाचे शटर तोडून 41 लाख 58 हजार रुपये किमंतीचे 90 आयफोन मोबाईल,19 हजार 228 रुपयाचे आयपेड 1 व 42 हजार 262 रुपयाचे चार्जर 40 नग असा 42लाख 19 हजार 490 रुपये किमंतीचे साहित्य दरोडेखोरांनी पळविले होते.याप्रकरणी गोदाम चालक राजेश नादत यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तपास सुरु केला होता.तसेच रांजणोली गावतील डीएचएल सप्लाय चैन इंडिया प्रा.ली.या गोदामात 25 जानेवरी रोजी 39 लाख 57 हजार 750 रुपचे डेल कंपनीचे तब्बल 76 लॅपटॉप दरोडेखोरांनी लंपास केले होते. कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदामात मोठ्या प्रमाणात दरोडा पडल्यामुळे पोलीसांपुढे काही धागेदोरे नसताना या दोन्ही गुन्ह्यातील तपासाला पोलीस उपायुक्त मनोज पाटील, व कोनगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश सांवत यांच्या मार्गदशनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व्ही.के.देशमुख,पोलीस उपनिरीक्षक पवन नांद्रे यांच्या पथकाने तपास सुरु केला असता तपासात दरोडा टाकणारे दुसरे कोणी नसून या गोदाम परिसरात ड्रायव्हर, हमाल व अन्य मजुरीचे काम करणारे कामगार असल्याची पक्की खबर या पथकाला मिळाल्याने त्यांनी कर्नाटक राज्यातील संतोष उर्फ माळ्या गंगाराम चौहान (30) याला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीने 17 जानेवारी रोजी गेले असता त्याने व त्याच्या पत्नीने पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी कर्नाटक राज्यातील शोपूर या स्थानिक पोलीस ठाण्यात कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करीत त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेवून अटक केली. त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली देत 9 साथीदारांच्या मदतीने हा दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्या माहितीनुसार आणखी आरोपी निष्पन झाल्याने पोलीस पथक पुन्हा कर्नाटकातील यादगीर जिल्हातून पुरू उर्फ भूता राठोड, (24) संतोष राठोड (19) आनंद राठोड (20) आणि रोशन राठोड उर्फ रोशनकुमार प्रसाद (20) अश्या चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून दरोड्यातील चोरीला गेलेले साहित्य जप्त करीत गुन्ह्यातील वापरलेले वाहनही जप्त केले .तर पोलीस उपनिरीक्षक पवन नांदे यांच्या पथकाने या गुन्हातील आरोपीना कर्नाटक राज्यात जावून जेरबंद केले. यामध्ये आरोपी शरणप्पा उर्फ शरनू, ड्रायव्हर (31 ) गेनुसिंग चव्हाण (39) संजय कुमार उर्फ मुन्ना बाबू कुळा (38) आणि किरण श्रीनिवास चव्हाण ( 27 ) अशा एकूण दहा दरोडेखोरांना अटक करून त्यांचाकडून चोरीला गेलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. या गुन्हातील अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून त्यांनी इतरही ठिकाणी दरोडे टाकले असावेत यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला असून या दोन्ही गुन्ह्यात तब्बल 15 ते 20 दरोडेखोर असण्याची शक्यता पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी व्यक्त केली आहे.

0 comments:

Post a Comment