कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापुरात ट्रॅफिक पोलिसाने रस्त्यातच एका तरुणाला मारले हा प्रकार एका प्रत्यक्षदर्शीने मोबाईल कॅमेऱ्यात शूटींग केल्याने उघडकीस आला आहे.
ट्रॅफिक पोलिसाने रंकाळा परिसरातील क्रशर चौकात एका वाहनचालकाला अडवून लायसन्स आणि गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्र नसतील तर पैशाची मागणी केली . यावेळी तरुणाने पैसे घेणाऱ्या पोलीसाचा मोबाईलमध्ये शूटिंग केले . आपले शूटिंग होत आहे हे लक्षात येताच पोलिसाने त्याचा मोबाईल काढून घेतला कानाखाली मारली .
वाहन चालकांनेही पोलिसाला ढकलले व स्वत ची सुटका करून घेतली . या सगळ्या प्रकारादरम्यान तिथे जमलेल्या काही प्रत्यक्षदर्शी तरुणांनी पोलिसाने केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ तयार केला व सोशल मीडियावर व्हायरल झाला.
पोलिसाने भर चौकात तरुणाला मारल्याने या परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. वाहनांना शिस्त लावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना पैशासाठी मारण्याचा अधिकार आहे का ?.
आणि अशा लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याला प्रशासन पाठीशी घालणार की त्याला शिक्षा करणार असा सवाल या निमित्ताने समोर येत आहे.
- पण या निमित्ताने काही कर्तव्यदक्ष व प्रामाणिक पोलीसांना मात्र मान खाली घालायला लागली आहे !
0 comments:
Post a Comment