गर्भलिंग निदान व स्त्री भृणहत्या या प्रकरणी सध्या संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे विधिमंडळातही याचे पडसाद उमटले ,मंत्र्यानी दोषींवर कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत सांगली जिल्ह्यातील म्हैशाळमधील अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश झाल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या आरोग्य विभागाने राज्यातील विविध रुग्णालयांवर धाड टाकण्यास सुरुवात केली आहे.
गर्भपात करण्यासाठी लागणारी औषधे MTP किट सहसा कोणत्याही औषध दुकानात मिळत नाहीत ती शक्यतो हॉस्पिटलमधील दुकानातच मिळतात , पण याबरोबरच अश्या MTP किटची ऑनलाईन फार्मसीवर मात्र बिनधास्तपणे विक्री सुरु आहे,
ज्यापद्धतीने एखादा मोबाईल सहज खरेदी करावा त्याप्रमाणे ऑनलाईन फार्मसी वर MTP किट घरबसल्या आरामात विकत मिळू शकतात, सोबत वेबसाईटचे फोटो दाखवले आहेत काही वेबसाईटवर डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन अपलोड करावे लागते पण कॉम्प्युटरवर असे बोगस प्रिस्क्रिप्शन तयार करून अपलोड केले जाऊ शकते,अधिकाधिक विक्री करून नफा मिळवण्याच्या मागे लागलेल्या अश्या ऑनलाईन फार्मसीवर सध्या सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे
प्रशासनाने अश्या ऑनलाईन फार्मसीवरसुद्धा विक्रीला निर्बंध घालून कारवाईची गरज आहे अन्यथा अवैध गर्भपात कारवाई म्हणजे दरवाजा उघडा न्हाणीला बोळा असे म्हणण्याची वेळ येईल




0 comments:
Post a Comment