Saturday, 4 March 2017

ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांची हत्त्या आर्थिक कारणावरून झाल्याची शक्यता


डॉ.कृष्णा किरवले यांचा काल सायंकाळी ४ च्या सुमारात राजेंद्रनगर येथील त्यांच्या घरात खून झाला होता. या प्रकरणात प्रीतम पाटील (३०) या तरुणाला कालच अटक करण्यात आली होती.तो त्याच्या घरी सुतारकामाचे पैसे मागण्यासाठी गेला होता , त्यावेळी प्रीतमकडे सुतार कामाची हत्यारे ठेवण्याची बॅग होती.हल्ल्यातील वापरलेले धारदार शस्त्र त्याने  या बॅगेतुन आणले असल्याची शक्यता आहे,३ ऱ्या मजल्यावर त्याने डॉ. किरवले यांच्यावर धारदार शस्त्राने  वार केले. त्यानंतर डॉ. किरवले जीव वाचवण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये धावले यावेळी किरवले यांच्या पत्नी कल्पना यांनी आरडाओरड करत शेजाऱ्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले. या घटनेची माहिती राजारामपुरी पोलिस ठाण्यात देण्यात आल्यानंतर तत्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले.फर्निचरच्या केलेल्या कामाचे पैसे मागण्यावरूनच हा प्रकार झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे 

0 comments:

Post a Comment