Tuesday, 7 March 2017

शाहूपुरी पोलिसांचा वाहनचालकांवर कारवाईचा स्ट्राईक


प्रतिनिधी - संदीप पोवार
शहर वाहतूक पोलिसांना न जुमाननाऱ्या बेदरकार वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी आज अचानक शाहूपुरी पोलिसांनी स्टेशन रोडवर कारवाई करत स्ट्राईक केला.शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर काही वाहन चालक वारंवार वन वे तोडणे,टिबल सीट जाणे,सिग्नल तोडणे असे कायद्याचे उल्लंघन करत असतात , हि बाब शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण चौगुले यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी आपल्या सहकारी पोलीस कर्मचार्यांना याबद्दल कारवाईची सूचना केली
   त्यानुसार पोलीस नाईक सुभाष कांबळे व सहकार्यांनी अश्या सर्व नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना अडवून तपासणी केली असता विनापरवाना,टिबल सीट,वन वे तोडणे अश्या नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दंड केला व कडक शब्दात सुनावले जवळपास २५ ते ३० वाहनचालकांवर दिवसभरात कारवाई करण्यात आली


0 comments:

Post a Comment