फेब्रुवारी महिन्यातच भिवंडी एसटी स्थानकाबाहेर रिक्षाचालकांनी केलेल्या बेदम मारहाणीनंतर एसटीचालक प्रभाकर गायकवाड यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.आज पुन्हा एकदा रिक्षाचालकाची गुंडागर्दी समोर आली आहे ,एसटी स्थानकाच्या गेटवर रिक्षा आडवी लावल्यावरुन रिक्षाचालक शफिक शेख आणि वाहतूक पोलिस रविकांत पाटील यांचा वाद झाला. मात्र शफिक शेखने कर्त्यव्यावर असलेल्या पोलीस रविकांत पाटील यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत पाटील जखमी झाले आहेत.
मागीलवेळी बस ड्रायव्हरच्या मृत्यू नंतरही आरोपीवर कारवाई करण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या पोलिसांनी यावेळी मात्र पोलिसालाच मारहाण झाल्याने यावेळी तत्परता दाखवत आरोपी शफिक शेखवर निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे


0 comments:
Post a Comment