Sunday, 5 March 2017

म्हैशाळ येथे हॉस्पिटल शेजारी खोदकाम करताना मृत अर्भके सापडली , बेकायदेशीर गर्भपाताचा संशय

म्हैशाळ येथील भारती हॉस्पिटल शेजारी खोदकाम करताना ५ मृत अर्भकं सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगली जिल्ह्यातील म्हैशाळ इथे गर्भलिंग निदान आणि गर्भपात केलं जात असल्याचा पोलिसांना संशय आहे

पिशव्यातील मृत अर्भकं किती महिन्यांचे आहेत, हे वैद्यकीय तपासणीनंतर उघड होणार आहे. याप्रकरणी डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे यांचे भारती हॉस्पिटल हे अवैध गर्भपाताचे केंद्र असल्याचे उघडकीस आले आहे

काही दिवसांपूर्वी स्वाती जमदाडे या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला होता. दोन मुलींनंतर तिसरी मुलगीच असल्याने पतीने पत्नीला गर्भपात करण्यासाठी म्हैशाळमध्ये आणलं होत. त्यानंतर या प्रकरणी डॉक्टरचा साथीदार प्रविण जमदाडेला अटक करण्यात आली होती, तर डॉ.बाबासाहेब खिद्रापुरेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना या मृत अर्भकांच्या 19 पिशव्या सापडल्या..
याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत

0 comments:

Post a Comment