Dnyanraj Patil - Chief Reporter
वाहनचालकाकडे गाडीची कागदपत्रं मागू नयेत, असे आदेश वाहतूक पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबेंनी दिलेत.मुंबईतील वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियंमांचे पालन करणं आणि मुंबईतील वाहतुकीमध्ये शिस्त आणणं अपेक्षित असून त्यांनी आरटीओतर्फे देण्यात येणारी पीयुसी, विमा, ग्रीन टॅक्ससारख्या कागदपत्रांची तपासणीकरिता वाहनधारकांकडे मागणी करू नये असा कार्यालयीन आदेशच मुंबई पोलिसांनी काढला आहे. अश्या प्रकारचा मेसेज सर्वत्र सोशल मीडियावर फिरत आहे
यामागील सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता फक्त पीयुसी, विमा, ग्रीन टॅक्स याच कागदपत्रांना सूट आहे पण वाहनचालकाला वाहनचालक परवाना,वाहनाचे रजिस्ट्रेशन कागदपत्रे दाखवणे अनिवार्य आहे कारण या मेसेजचा चुकीचा अर्थ काढून ट्राफिक पोलिसांना कोणतीच कागदपत्रे तपासण्याचे अधिकार नाहीत हा जो गवगवा केला जात आहे तो कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने घातक आहे , नुकतीच कोल्हापूर ट्राफिक पोलिसांच्या दक्षपणामुळेच 50 च्यावर चोरीच्या मोटारसायकल हस्तगत करण्यात यश आले होते , जर ट्राफिक पोलिसांनी वाहनचालकांना हटकले नसते तर हि घटना उघडकीस आलीच नसती त्यामुळे वाहनचालकांची कागदपत्रे तपासण्याचा अधिकार हा RTO च्या बरोबरीने ट्राफिक पोलिसांनाही आहे त्यात फक्त पीयुसी, विमा, ग्रीन टॅक्स यांसारख्या कार्यालयीन कागदपत्रांना सूट आहे


0 comments:
Post a Comment