Wednesday, 15 March 2017

वाहनचोरी व घरफोडी 2 अट्टल चोरांना अटक

प्रतिनिधि - संदीप पोवार

पन्हाळा, कळे, वडगाव, वाळवा आदी भागात वाहनांच्या चोर्या आणि घरफोड्या करणार्या व
हातकणंगले, वाळवा, पन्हाळा या तीन तालुक्यात धुमाकूळ घालणार्या दोघा अट्टल चोरट्यांना जेरबंद करण्यात आले. सूरज ऊर्फ सनी ऊर्फकैलास सर्जेराव दबडे (वय २0, रा. साखरवाडी वाठार) आणि अतुल पांडुरंग चौगुले (वय १९, रा. येडेनिपाणी, ता. वाळवा) अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून मोटारसायकली, मोबाईल हॅण्डसेट आणि सोन्या-चांदीचे दागिने असा साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वडगाव-वाठार मार्गावर  एका मोटारसायकलवरुन दोघेजण येत असताना त्यांना पोलीसांकडुन संशयावरुन ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच पन्हाळा, कळे, वडगाव, वाळवा आदी भागात वाहनांच्या चोर्या आणि घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून हिरोहोंडा स्प्लेंडर, सीडी डिलक्स अशा दहा मोटारसायकली, २0 मोबाईल हॅण्डसेट, एक लॅपटॉपसह सोन्या-चांदीचे दागिने असा ४ लाख ४६ हजार ७९0 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता १६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वडगावातील तीन व कळे येथील दोन घरफोड्या उघडकीस आल्या आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संतोष डोके व वडगाव पोलीस ठाण्याचे पोनि धनंजय जाधव यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

0 comments:

Post a Comment