Featured
Recent Posts

Sunday, 17 September 2017

कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूर येथे झालेल्या अपघातात पिंपळगाव खुर्द येथील दोन सख्खे भाऊ यांचा मृत्यू झाला असून तेजस महादेव घाटगे वय 35( विवाहित)तर लहान भाऊ योगेश महादेव घाटगे(अविवाहित) वय28 या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे
   तेजस घाटगे व योगेश घाटगे हे दोघे भाऊ तेजस याच्या मुलाच्या सीपीआर मधून  जन्म नोंदीचा दाखला आणतो असे सांगून घरातून निघून गेले होते. कोल्हापूर मधून परंत येत असताना हा अपघात झाला आहे, तेजस याचे लग्न होऊन त्याला दोन मुली व एक मुलगा झाला असून मोठ्या मुलीचे नाव तनुजा वय 6 वर्षे तर लहान मुलीचे नाव असाावरी वय4 वर्षे असून  1 महिन्या पूर्वीच तेजस ला एक मुलगा झाला होता त्याच्याच जन्म नोंदीचा दाखला आणतो असे   सांगून दोघे भाऊ कोल्हापूर ला आले असताना परत येताना काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. तेजस हा सेन्ट्रींग मजूर म्हणून काही दिवसा पासून काम करू लागला होता तर त्या आधी तो शेतीची कामे करून आपले पोट भरत होता तर योगेश हा एम आय डी सी मध्ये  वडिलांच्या बरोबर महालक्ष्मी स्टील येथे हेल्पर म्हणून काम करत होता या दोघांचे वडील एम आय डी सी मध्ये महालक्ष्मी स्टील येते गार्ड ची नोकरी करत होते दोघांच्या अश्या जाण्याने यांच्या कुटुंबावर मोठे संकट आले आहे. वडील मोलमजुरी करून घराची आर्थिक परिस्तिथी नसताना संसाराचा गाडा ओढत असताना अचानक पणे दोन्ही मुलाच्या जाण्याने आई वडिलांबरोबर तेजस च्या पत्नी व मुलांनावर मोठे संकट आले आहे.

Friday, 15 September 2017


मुरगूड प्रतिनिधी समीर कटके

मुरगुड ता.कागल येथील बसस्थानक परिसरात शालेय व महाविद्यालयीन मुलींची छेडछाड करणाऱ्या 6 सडक सख्याहारींना पोलिसांनी ताब्यात घेतले. बस स्थानकावर चांगलाच चोप देऊन ताब्यात घेतले. करवीर विभागाच्या निर्भया पथकाने ही कारवाई केली.
    मुरगूड शहर परिसरातील तीस चाळीस गावासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. माध्यमिक उच्च माध्यमिक , महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आदी शैक्षणिक संस्थांमध्ये पाच हजाराहून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेण्यास परिसरातील गावातून येतात.  बसस्थानक,महाविद्यालयाकडे जाणारे रस्ते आदी ठिकाणी कांही रोडरोमिओ मुलींची टिंगल टवाळी करत असतात. पोलीस स्टेशन रस्ता, खाऊ गल्ली, बस स्थानकाची दोन्ही गेट्स, डॉ बरकाळे यांच्या दवाखान्याशेजारी, नगर पालिका ग्रामीण रुग्णालय परिसर तसेच बस स्थानक प्लॅट फॉर्म या ठिकाणी अनेक तरुण , महाविद्यालयीन युवक, गावगुंड,मुलींचा पाठलाग,कॉमेंट,छेडछाड, मोटर सायकल वरून पाठलाग आदी कृत्य करताना सर्रास दिसतात. याबाबत अनेक वेळा मुलींनी तक्रारी केल्या आहेत.  आज करवीर विभागाच्या निर्भया पथकाला कांही मुलींनी याबाबत माहिती दिली होती.त्यानुसार आज सकाळी साडे बारा वाजण्याच्या सुमारास मुरगूड बसस्थानक परिसरात निर्भया पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अर्धा तास सिव्हिल ड्रेसवर येऊन पाहणी केली.व याठिकाणी असणाऱ्या 6 रोडरोमिओना  बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेश द्वारावर हे रोड रोमिओ पळून जाऊ नयेत याची दक्षता घेत चोख बंदोबस्त ठेवला होता.त्यामुळे हे सहा रोडरोमिओ अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडले.त्यांना पोलीसी खाक्या दाखवला.मुरगूड पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर बी.पी. 110/117 प्रमाणे कारवाई करून समज देण्यात आली.या कारवाईत करवीर विभाग निर्भया पथकाच्या पी.एस.आय. अंजना फाळके,पोलीस नाईक एस.व्ही.भोसले,पोलीस शिपाई डी.सी.पाटील,व्ही.एस.कांबळे,व्ही.व्ही.चव्हाण हे सहभागी झाले होते.
   निर्भया पथकाच्या  कारवाईचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. गेल्या काही वर्षांपासून हा प्रश्न गंभीर झाला आहे. सडक छाप युवकांच्या घाणेरड्या कृतीमुळे शहराच्या लौकिकास गालबोट लागत असल्याची भावना व्यक्त होत असते. या प्रवृत्तीना आळा न बसल्यास शहराचे शैक्षणिक महत्व ढासळले अशीही भावना शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत असते त्यामुळे या कारवाईचे स्वागत होत आहे. मुरगुड पोलिसांनी समुपदेशकाची भूमिका बंद करून ठोस पावले उचलावीत अशी मागणी अनेक महिन्यापासून होत आहे.

फोटो ओळी : मुरगूड : येथे करवीर विभाग निर्भया पथकाने रोड रोमिओ वर कारवाई करत ताब्यात घेतले.त्या प्रसंगी पी.एस.आय. अंजना फाळके,पोलीस नाईक एस.व्ही.भोसले व अन्य कर्मचारी.

       ( छायाचित्र :वेदांतिका फोटो,कुरुकली.)

Sunday, 10 September 2017

कोल्हापूर प्रतिनिधी सर्जेराव पोवार

कोल्हापूर येथील राजारामपुरी 6 वी गल्लीत बाईक वरून आलेल्या दोघांनी पस्तीस हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन लंपास केली. .
श्रीमती पुनम प्रकाश नारकर रा.कळंबा  व त्यांच्या च्या नातलग श्रीमती गांधी या दोघी पायी भजनासाठी जात असताना समोरून आलेल्या काळ्या रंगाच्या मोटार सायकली वरून मागे बसलेल्या व्यक्तीने श्रीमती नारकर यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून बळजबरीने चोरून नेली..राजारामपुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला आहे.
या प्रकारामुळे कोल्हापूर व परिसरामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी नाकेबंदी करून आळा घालण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Thursday, 7 September 2017

कोल्हापूर प्रतिनिधी संदीप पोवार 


कसबा बावड्यातील निवारा काॅलनीमध्ये राहणार्या श्रीमती संजीवनी संजय सुतार  (वय वर्षे 38, ,प्लाॅट नं.465,डी, निवारा काॅलनी कसबा बावडा) या दिनांक 31/8/2017 ते दिनांक 5/9/2017 या दरम्यान आपल्या आई आजारी असल्याने मु.पो.केरली ता.करवीर  येथे आपल्या मुलासह आईला पहाण्यासाठी गेल्या होत्या. पण त्यांच्या आई रूग्णालयात उपचारादरम्यान मयत झाल्याने श्रीमती संजीवनी सुतार गावीच थांबल्या त्याचीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या रहात्या घराच्या लोखंडी गेटचे कुलूप उघडून मेन दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. बेडरूम मधील कपाटाचे लाॅक उचकटून त्यातील सोन्याचे पेंडंट अललेली लहान व मोठी दोन गंठणे, कानातील कर्णफुले, खडा असलेली सोन्याची अंगठी,  रोख रक्कम असा सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. या घटनेची नोंद शाहुपूरी पोलीस स्टेशन मध्ये झाली असून शाहुपूरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.भांगे व हेड काॅन्स्टेबल मोहिते  अधिक तपास करत आहेत.
यापूर्वीही अनेकदा कसबा बावड्यात कॉलन्यांमध्ये घरफोड्या व चोर्‍या झाल्या असून कोणत्याही चोरीचा शोध लागला नाही. रात्रीची गस्त खरोखरच सुरू आहे का व मागील चोर्‍यांचा तपास लागला नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे तसेच चोरांचा शोध लागत नसल्याने पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त होत आहे.

Wednesday, 6 September 2017

कोल्हापूर प्रतिनिधी संदीप पोवार 

दाभोळकर कॉर्नर येथील प्रभाकर प्लाझा मध्ये उमेश माणगावे यां वकिलांच्या ऑफिसला मंगळवारी रात्री एकच्या सुमारास शाॅटसकीटमुळे आग लागली स्फोट एवढा प्रचंड होता की खिडकीचे तावदाने वाकून काचा फुटून रस्त्यावर पडल्या होत्या मोटारसायकल वरून येणारे जाणारे नागरिक काचा लागून किरकोळ जखमी झाले अग्नीशामकच्या गाड्या व शाहुपूरी पोलीस स्टेशन चे पोलीस तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

     अॉफिस ला नेमकी कशाने आग लागली हे अजून अनिश्चित असले तरी शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत सुमारे लाखाचे नुकसान झाले असावे यात न्यायालयीन कागदपत्रे, फर्निचर वायरिंगचा समावेश आहे.

Tuesday, 5 September 2017

कोल्हापूर (प्रतिनिधी) : न्यायालयाचे काम आटपून आजऱ्याहून कोल्हापुरला येत असताना स्तवनिधी (तवंदी ) घाटात हिटणी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर येथील अॅडव्होकेट जावेद मुल्ला (वय.४७, रा. टेंबलाईवाडी, कोल्हापूर), देवानंद वाघमारे (रा. कोल्हापूर) आणि त्यांचे अशील चंद्रकांत श्रीपती पाटील (पन्हाळा) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अॅडव्होकेट जावेद मुल्ला व अन्य दोन असे आजरा येथे कोर्ट कामासाठी गेले होते. कोल्हापूरकडे येत असताना संकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील हिटनी गावाजवळत त्यांच्या अल्टो मोटारीचा MH09 DX 9688 चा अपघात होऊन मुल्ला, वाघमारे आणि पाटील (पन्हाळा) यांचे जागीच मृत्यू झाले आहे. मुल्ला हे कोल्हापूर जिल्हा न्यायालयात फौजदारी वकील म्हणून काम करत होते.
प्राथमिक माहिती नुसार महामार्गावर मोटारीचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Thursday, 31 August 2017

कोल्हापूर प्रतिनिधी, सर्जेराव पोवार.

कोल्हापूर येथील क्राइम ब्रांच ने सराईत घरफोडी करणारा चोरटा राजू प्रकाश नागरगोजे उर्फ राजवीर सुभाष देसाई या घरफोडी करणाऱ्या रेकॉर्ड वरील अट्टल गुन्हेगारास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 4 घरफोडी गुन्हायातील 467 ग्रॅम वजनाचे एकूण 13,49563 रू.किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. गेले कित्येक दिवस कोल्हापूर शहर परिसरात झालेले अनेक घरफोडी चे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अनवेशन शाखेस यश मिळाले आहे.