कोल्हापूर प्रतिनिधी सर्जेराव पोवार
कोल्हापूर येथील राजारामपुरी 6 वी गल्लीत बाईक वरून आलेल्या दोघांनी पस्तीस हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन लंपास केली. .
श्रीमती पुनम प्रकाश नारकर रा.कळंबा व त्यांच्या च्या नातलग श्रीमती गांधी या दोघी पायी भजनासाठी जात असताना समोरून आलेल्या काळ्या रंगाच्या मोटार सायकली वरून मागे बसलेल्या व्यक्तीने श्रीमती नारकर यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून बळजबरीने चोरून नेली..राजारामपुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला आहे.
या प्रकारामुळे कोल्हापूर व परिसरामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी नाकेबंदी करून आळा घालण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
0 comments:
Post a Comment