मुरगूड प्रतिनिधी समीर कटके
मुरगुड ता.कागल येथील बसस्थानक परिसरात शालेय व महाविद्यालयीन मुलींची छेडछाड करणाऱ्या 6 सडक सख्याहारींना पोलिसांनी ताब्यात घेतले. बस स्थानकावर चांगलाच चोप देऊन ताब्यात घेतले. करवीर विभागाच्या निर्भया पथकाने ही कारवाई केली.
मुरगूड शहर परिसरातील तीस चाळीस गावासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. माध्यमिक उच्च माध्यमिक , महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आदी शैक्षणिक संस्थांमध्ये पाच हजाराहून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेण्यास परिसरातील गावातून येतात. बसस्थानक,महाविद्यालयाकडे जाणारे रस्ते आदी ठिकाणी कांही रोडरोमिओ मुलींची टिंगल टवाळी करत असतात. पोलीस स्टेशन रस्ता, खाऊ गल्ली, बस स्थानकाची दोन्ही गेट्स, डॉ बरकाळे यांच्या दवाखान्याशेजारी, नगर पालिका ग्रामीण रुग्णालय परिसर तसेच बस स्थानक प्लॅट फॉर्म या ठिकाणी अनेक तरुण , महाविद्यालयीन युवक, गावगुंड,मुलींचा पाठलाग,कॉमेंट,छेडछाड, मोटर सायकल वरून पाठलाग आदी कृत्य करताना सर्रास दिसतात. याबाबत अनेक वेळा मुलींनी तक्रारी केल्या आहेत. आज करवीर विभागाच्या निर्भया पथकाला कांही मुलींनी याबाबत माहिती दिली होती.त्यानुसार आज सकाळी साडे बारा वाजण्याच्या सुमारास मुरगूड बसस्थानक परिसरात निर्भया पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अर्धा तास सिव्हिल ड्रेसवर येऊन पाहणी केली.व याठिकाणी असणाऱ्या 6 रोडरोमिओना बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेश द्वारावर हे रोड रोमिओ पळून जाऊ नयेत याची दक्षता घेत चोख बंदोबस्त ठेवला होता.त्यामुळे हे सहा रोडरोमिओ अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडले.त्यांना पोलीसी खाक्या दाखवला.मुरगूड पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर बी.पी. 110/117 प्रमाणे कारवाई करून समज देण्यात आली.या कारवाईत करवीर विभाग निर्भया पथकाच्या पी.एस.आय. अंजना फाळके,पोलीस नाईक एस.व्ही.भोसले,पोलीस शिपाई डी.सी.पाटील,व्ही.एस.कांबळे,व्ही.व्ही.चव्हाण हे सहभागी झाले होते.
निर्भया पथकाच्या कारवाईचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. गेल्या काही वर्षांपासून हा प्रश्न गंभीर झाला आहे. सडक छाप युवकांच्या घाणेरड्या कृतीमुळे शहराच्या लौकिकास गालबोट लागत असल्याची भावना व्यक्त होत असते. या प्रवृत्तीना आळा न बसल्यास शहराचे शैक्षणिक महत्व ढासळले अशीही भावना शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत असते त्यामुळे या कारवाईचे स्वागत होत आहे. मुरगुड पोलिसांनी समुपदेशकाची भूमिका बंद करून ठोस पावले उचलावीत अशी मागणी अनेक महिन्यापासून होत आहे.
फोटो ओळी : मुरगूड : येथे करवीर विभाग निर्भया पथकाने रोड रोमिओ वर कारवाई करत ताब्यात घेतले.त्या प्रसंगी पी.एस.आय. अंजना फाळके,पोलीस नाईक एस.व्ही.भोसले व अन्य कर्मचारी.
( छायाचित्र :वेदांतिका फोटो,कुरुकली.)
0 comments:
Post a Comment