Saturday, 25 March 2017

दात बसवणाऱ्या तिघा बोगस डॉक्टर्सना मुरगूड पोलिसांकडून अटक.



समीर कटके मुरगूड प्रतिनिधी

कागल तालुक्यातील बिद्री - मुदाळ तिट्टा परिसरात केवळ दोनशे- चारशे रुपयात दात बसवणाऱ्या तीन

परप्रांतीय बोगस डॉक्टर्सना मुदाळ तिट्ट्यावरील एका डेंटिस्टने दिलेल्या माहितीच्या आधारे पकडून

मुरगूड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तरनसिह गुरुदत्तसिंग कापसे (रा.राहूनगरी,जि.

बीजनवर,उत्तरप्रदेश) मनजीतसिंग जापानसिंग गौड,(रा.नूरपूर,जि.बीजनवर,उत्तरप्रदेश)हरप्रीतसिंग तारासिंग

राठोड,(रा.राहूनगरी,जि. बीजनवर,उत्तरप्रदेश) अशी त्याची नावे आहेत.गेली तीन दिवस हे तिघे मुरगूड

पोलिस ठाण्यात असून देखील कोणीही वैद्यकीय अधिकारी तक्रार देण्यास पुढे आले नसल्यामूळे

त्यांच्यावर कसलीही कारवाई पोलीसांना करता आलेली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी,उत्तरप्रदेशातील बीजनवर जिल्ह्यातून आलेले तीन बोगस दातांचे

डॉक्टर गेल्या कांही दिवसापासून राधानगरी येथे माळकर यांच्या भाडोत्री घरी वास्तव्यास आहेत.ते

दररोज खेडेगावात घरोघरी जावून ज्या लोकांचे दात पूर्वीच काढले आहेत किंवा पडले आहेत अशा

रुग्णांना अँक्रेलीकचे दात बसवून देणे व त्यासाठी ते दोनशे- चारशे रुपयांपासून लोकांच्या आर्थिक

स्थिती नुसार मिळेल त्या पध्द्तीने पैसे घेत होते.त्यासाठी लागणारेे दात दिल्लीहून विकत आणून ते

बसवतात यासाठी त्याच्याकडे कोणतीही पदवी नाही. किंवा कसलाही परवाना नाही.

त्यामूळे हे अत्यंत असुरक्षित आहे.दात संवेदनशील भाग असल्याने त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कमी

दर्जाच्या औषधामूळे व केमिकल्समूळे कँन्सर सारखे भयानक रोग होण्याची काही डॉक्टर्स व त्यांचे

समर्थक व्यक्त करतात.तशी संबंधित डॉक्टरची तक्रार असल्याने पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

यामधील हरप्रीतसिंग तारासिंग राठोड,( रा.राहूनगरी,जि. बीजनवर,उत्तरप्रदेश ) याचे आजोबा हा व्यवसाय

आपल्या गावी करत होते.त्याचे शिकून आपण हा व्यवसाय करत असल्याचे त्याने सांगितले.आपण हा

व्यवसाय पोटासाठी करत असून लोकांना कमी पैशात आपण सेवा देत असल्याचे सांगतो.यामध्ये कांही

गैर नसल्याचेही तो सांगतो.त्याचा हा व्यवसाय वडीलोपार्जित असल्याचे ते सांगतात. आपण उपचार

केलेल्या रुग्णांची आजपर्यंत कोणतीही तक्रार नाही. कोणतेही ऑपरेशन, भूल, सुई, टाका, ब्लेडचा वापर

न करता गोरगरिबांना परवडेल अशा मोबदल्यात आपण ही सेवा देतो असे त्याने सांगितले.

गेल्या कांही दिवसापासून तरनसिंग गुरुदत्तसिह कापसे, रमनजीतसिह जापानसिह गौड, हरप्रीतसिह

तारासिह राठोड हे तिघे राधानगरी,मुदाळ तिट्टा परिसरात फिरत होते.या परिसरातील खाजगी प्रॅक्टिस

करणाऱ्या एका डॉक्टरच्या सांगण्यावरून सोमवारी दुपारी पकडून मुरगूड पोलीस ठाण्यात आणले.पण

त्याच्याबद्दल तक्रार देण्यासाठी कोणीही वैद्यकीय अधिकारी पुढे आले नाहीत.त्यामुळे मुरगूड पोलिसांनी

अद्याप त्याच्याबद्दल गुन्हा नोंद केला नसून पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले

आहे.

0 comments:

Post a Comment