प्रतिनिधी - संदीप पोवार
चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणे, लैंगिक अत्याचार करणे यासाठी तिघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे.शाहूपुरी पोलीस स्टेशनचे चे पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार चौदा वर्षांची पीडित अल्पवयीन मुलगी विक्रमनगर,कोल्हापूर येथे आईसोबत राहते.तिला वडील नाहीत. आई मार्केट यार्ड येथे मोलमजुरी करते. काही वेळा ही मुलगी आईसोबत कामाच्या ठिकाणी येते. १७ फेब्रुवारी रोजी आईने किरकोळ कारणावरून रागावल्याने नाराज होऊन मुलगी सांगलीला जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात गेली रिक्षातून जाताना स्नेहा पटेल या महिलेबरोबर तिची ओळख झाली.स्नेहाने तिला विश्वासात घेऊन तिच्या एकटेपणाचा व असाह्ययपणाचा फायदा घेत तिला आपल्या घरी सांगलीला नेले दोन दिवस घरात ठेवून त्यानंतर तिला एका तरुणाबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती केली. त्यातून मिळणार्या 3 हजार रुपयांपैकी 1500 रुपये तुला देतो, असे सांगितले होते. मुलगी नकार देत असतानाही जबरदस्तीने तिला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर आणखी दोन तरुणांकडे पाठवून दिले होते.आणखी पाच ते सहा तरुणांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला व स्नेहाने पैसे मिळवले याप्रकरणी सूरज रमेश काळे ,लोकेश जाधव ,सचिन ऊर्फ बबलू बलदवा हे साहाय्य करत होते तसेच तिला वेश्या व्यवसाय करायला लावून त्याद्वारे तिला फक्त जेवण व कपडे दिले जात होते.मुलीस पुण्याला विकण्याचा त्यांचा कट होता, हे त्या मुलीस समजल्यावर ती घरातून बाहेर पळून आली. त्यावेळी तिचा पाठलाग करून मोटारसायकल अंगावर घालण्याचा प्रयत्न केला . हा प्रकार रस्त्यावरील लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांनी पोलिसांत तक्रार दिली. पीडित मुलीस सांगली पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर तिला कोल्हापुरात आणले. तिला पळवून नेऊन वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणे, अत्याचार करणे या कलमान्वये सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील या सूरज रमेश काळे (वय २१, रा. कुपवाड, जुना बुधगाव रोड, मिरज), लोकेश ऊर्फ आकाश लक्ष्मण जाधव (वय २१, रा. कुपवाड एमआयडीसी), सचिन जुगलकिशोर बलदवा (वय ३८, रा. उल्हासनगर, मिरज, सांगली) तिघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देशमुख हे शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत

0 comments:
Post a Comment