प्रतिनिधि - संदीप पोवार
पेंटिंग व्यवसाय करत असलेल्या शुभम गब्बर कांबळे (वय १७, रा. टेंबलाई नाका) याच्यावर निव्वळ एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून झालेल्या तलवारहल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडल्यावर डोक्यात व हातावर गंभीर वार झाल्याने त्याला सीपीआरमध्ये दाखल केले आहे.
पोलीसांना दिलेल्या जबाबाप्रमाणे जखमी शुभम कांबळे याची आत्या विचारे माळ,सदर बाजार येथे अश्विनी आनंदा कांबळे राहते. शनिवारी दुपारी तो तिच्याकडे गेलो होता, यावेळी संशयित आरोपी ऋतुराज, सिद्धार्थ, गब्बर सूर्यवंशी यांच्याबरोबर शुभमची एकमेकाकडे पाहण्यावरुन वादावादी झाली , त्यानंतर तो सायंकाळी ६ वाजता दुचाकीवरून निघाला असता शाहू कॉलेजसमोर ऋतुराज, सिद्धार्थ, गब्बर सूर्यवंशी यांनी अडवून आमच्याकडे काय बघतोस ? असे म्हणून तलवारहल्ला केला. त्याच्यावर हल्ला झाल्याचे समजताच नातेवाईक, मित्रांनी सीपीआरमध्ये दाखल केले , नेमके याचवेळी त्याचे काही मित्र सदर बाजारकडे जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे जात होते. यावेळी उद्योग भवन येथे हल्ला करणारे संशयित हल्लेखोर त्यांना दिसून आले. दोघेही आमने-सामने आल्याने या ठिकाणी पुन्हा दोन गटांत हाणामारी झाली. या प्रकाराची माहिती समजताच शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले, सहायक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पण याप्रकरणावरुन किरकोळ कारणावरुन जर तलवार हल्ले होऊ लागले तर शहरातील वाढत्या गुन्ह्यांमुळे पोलिसांचा गुन्हेगारांवरील धाक कमी होऊ लागला आहे .
0 comments:
Post a Comment