प्रतिनिधी - सर्जेराव पोवार
दि १९/०६/२०१३ रोजी लक्षमीपुरी प्रभात टायर्स येथे एका महिलेचा खून झाला होता त्याप्रकरणी पोलिसांनी संशयित म्हणून दिलीपसिंग लहरीया याला अटक करून त्याच्यावर खटला चालवला होता त्यात संशयित सिरीयल किलर दिलीपसिंग लहरीया याची तिसर्याहि खून आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे , याप्रकरणी सरकार पक्षातर्फे ७ साक्षीदार तपासण्यात आले तर आरोपीचे वकील ऍड दत्ताजी कवाळे यांनी युक्तिवाद करताना आरोपीचे विरुद्ध खून प्रकरणी कोणताही सबळ प्रत्यक्षदर्शी पुरावा नाही तसेच पोलिसांनी त्यांचे नेहमीचेच साक्षीदार नोंदवल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले हा युक्तिवाद ग्राह्य धरत जिल्हा व सत्र न्यायाधीश आर जी अवचट यांनी आरोपी लहरीया याची निर्दोष मुक्तता केली , यापूर्वीही शाहूपुरी पोलिसांनी दाखल केलेल्या दोन खून खटल्यातून आरोपी लहरीया याची निर्दोष मुक्तता झालेली आहे

0 comments:
Post a Comment