बाबासो जाधव यांचेकडून -
पन्हाळा बुधवार पेठ येथे पजेरो स्पोर्ट्स MH09 DA 3848 या कारला अपघात झाला आहे , सकाळी सुमारे ७ च्या सुमारास भरधाव वेगाने चाललेल्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन हा अपघात झाला आहे , कारचा वेग इतका जास्त होता कि रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला गाडी धडकून हा खांब मोडला व गाडी रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली,पजेरो स्पोर्ट्स कारचे अपघातात प्रचंड नुकसान झाले आहे
सुदैवाने शेजारील घरातील कोणीही व्यक्ती किंवा लहान मुले यावेळी घराबाहेर नव्हती नाहीतर फार मोठी दुर्घटना घडली असती , या कारमधील दोन जखमी व्यक्तींना पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवल्याचे समजते



0 comments:
Post a Comment