Tuesday, 7 March 2017

म्हैसाळ गर्भपात रॅकेट सूत्रधार डॉ बाबासाहेब खिद्रापुरेला अटक

       
 सांगली पोलिसांनी अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश करून  रॅकेटचा प्रमुख सूत्रधार डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याला मंगळवारी रात्री उशिरा बेळगाव येथून अटक केली, एका विवाहितेच्या मृत्यूनंतर तक्रारीनंतर  रविवारी पोलिसांनी या अवैध गर्भपात रॅकेटचा तपास सुरु करून  याप्रकरणी तिचा पती व डॉ. खिद्रापुरे यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. याचा तपास करताना पोलिसांना, खिद्रापुरे याचा गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदा गर्भपाताचा हा उद्योग सुरू असल्याची माहिती मिळाली.
         डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेच्या अटकेनंतर यापेक्षा आणखी धक्कादायक माहिती समोर येऊ शकते.या प्रकरणात किमान ५ ते १० डॉक्टरांचा समावेश असून आतापर्यंत ज्या डॉक्टरांनी डॉ.खिद्रापुरेकडे पेशंट पाठवले होते त्या सर्वांची कागदपत्रांवरून नोंदी आढळल्याने चौकशी होणार आहे, केवळ BHMS हि होमिओपॅथीची पदवी असताना एखादा डॉक्टर गर्भपात असा करू शकतो,तसेच आतापर्यंत सरकारी यंत्रणा झोपली होती काय ? असा सवाल वैद्यकीय वर्तुळातून विचारला जात आहे 

0 comments:

Post a Comment