Tuesday, 21 March 2017

बसेरा हॉटेल मागील बंद फ्लॅटमध्ये घरफोडी - सुमारे 5 लाखांचा ऐवज लंपास



प्रतिनिधी - संदीप पोवार

आज दुपारी दि २१/०३/२०१७ रोजी दुपारी १२ ते २ च्या सुमारास महावीर कॉलेज समोरच्या बसेरा हॉटेल मागील  संकल्प प्रियद अपार्टमेंट येथे राहणाऱ्या सागर मोहन मगदूम वय ४४ यांच्या  बंद फ्लॅटमध्ये घरफोडी झाली आहे -यात  सुमारे 5 लाखांचा ऐवज लंपास चोरांनी लंपास केला आहे चोरीला गेलेल्या मालमध्ये २२२ ग्राम सोन्याचे दागिने व रोख चाळीस हजार रकमेचा समावेश आहे
   सागर मगदूम हे त्यांच्या पत्नी व मुलासह बाहेर गेले असताना अज्ञात चोराने बंद फ्लॅटच्या दरवाजाचे लैच लॉक तोडून तसेच बेडरूममधील ड्रॉवर व कपाटाचे कुलूप उचकटून चोरी केली आहे, या प्रकरणाची नोंद शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये झाली असून पो नि प्रवीण चौगुले पुढील तपास करत आहेत 

0 comments:

Post a Comment