Thursday, 2 March 2017

ट्राफिक पोलीस मारहाण दोघांना अटक

प्रतिनिधी - सर्जेराव पोवार
बिंदू चौकात ड्युटीवर असलेले रोहित खाडे बक्कल न.1599 या ट्राफिक पोलिसाने वनवे तोडून जाणाऱ्या सिल्वर कलरच्या MH09 2099 या स्प्लेंडर चालकाला हटकले असता व परवाना विचारला असता त्यांना मद्यधुंद स्प्लेंडर चालकाने व साथीदाराने त्यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की केली व पळुन गेले , यात पोलीस रोहित खाडे हे आरोपीने नखांनी ओरबाडल्याने किरकोळ जखमी झाले होते , याप्रकरणी त्यांनी पोलिसात गुन्हा नोंदवला व वरिष्ठाना कळवले हाेते.
या प्रकरणाची पोलीस अधिक्षक महादेव तांबडे यांनी दखल घेत कठोर कारवाईचे आदेश दिले त्यानंतर जुना राजवाडा पोलीसांनी अत्यंत गतीने कारवाई करत दोघांना अटक केली ,
संतोष लक्ष्मण साळे वय २४ व श्रीकांत राम साळे वय ३४ दोघे रा. सुभाषनगर ,कोल्हापूर अशी आरोपींची नावे असुन त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे , मारहाण , शिवीगाळ , वाहन नियम मोडणे अशा विविध कारणाकरिता गुन्हा नोंदवला आहे .
या प्रकरणी सदरची कारवाई पोनि.अनिल देशमुख व सहकारी पोलीसांनी पार पाडली.

0 comments:

Post a Comment