Wednesday, 15 March 2017

कोल्हापुरात ‘पद्मावती’ चित्रपटाचा सेट जळाला कि जाळला ?




by -DNYANRAJ PATIL - KOLHAPUR
राजस्थानमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान करणी सेनेने  संजय लिला भन्साळी यांना मारहाण केली होती. तसंच शूटिंग करण्यास मनाई केली होती म्हणून कोल्हापूरच्या शांत व शूटिंगला अनुकूल अश्या वातावरणाची निवड करत मागील काही दिवसांपासून कोल्हापूरच्या मसाई पठारावर ‘पद्मावती’ सिनेमाचं शूटिंग सुरु केले होते मंगळवारी (१५ मार्चला) काही अज्ञातांनी मसाई पठारावर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हल्लाबोल केला आणि याठिकाणी उभारण्यात आलेल्या चित्रपटाच्या सेटला आग लावली. जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
   पण या निमित्ताने सोशल मीडियावर काही मेसेजही फिरत आहेत खरोखरच आग लागली का लावली ?
चित्रपटाला प्रसिद्धी मिळवण्यासाठी व इन्शुरन्सचे पैसे लाटण्यासाठी हा उपद्याप केला का ?
शांत आणि कलाप्रेमी कोल्हापुरात अशी घटना खरोखर समाज कंटकांनी घडवली का ? हा एक पब्लिसिटी स्टंट आहे ?
बाहेरून आलेले लोक एवढ्या मोठ्या जाळपोळ आणि दगडफेक घडवू शकतात काय ?
चित्रीकरणाची व पोलीस संरक्षणाची परवानगी काढली होती काय ?
कोल्हापूरच्या कलानगरीला या निमित्ताने कलंक लागला हे नक्की !

0 comments:

Post a Comment