Friday, 31 March 2017

खरेदीच्या बहाण्याने गंठण व मंगळसूत्र धूम टाईप लंपास , महिन्यातली सलग दुसरी घटना

प्रतिनिधी - संदीप पोवार

दुकानदार महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्यांचे दागिने दुकानात बिस्कीट पुडा खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांनी लंपास करण्याची घटना घडली आहे कोल्हापुरात गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारात भोसलेवाडी येथील गगनगिरी हौसिंग सोसायटीमध्ये हा प्रकार घडला.
  दिनकर बाटे यांचे भोसलेवाडी येथील गगनगिरी हौसिंग सोसायटीमध्ये दुकान आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोघे तरुण दुचाकीवरून आले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधला होता. तसेच डोक्याला टोपी घातली होती. दुकानात आल्यानंतर त्यांनी शशिकला बाटे यांच्याकडे बिस्कीट पुडा मागितला. बिस्कीट पुडा काढण्यासाठी शशिकला पाठीमागे वळत असताना त्यातील एका तरुणाने गळ्यातील तीन तोळ्यांचे गंठण व दोन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसडा मारून तोडून घेतले व ते धूम स्टाईलने पसार झाले ,
यापूर्वी अशीच घटना याच महिन्यात जाधववाडी परिसरात घडली होती , परिसरातील नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण आहे , तसेच पोलसांनी दुचाकीस्वारांचे कोम्बिंग ऑपरेशन करावे अशी मागणी होत आहे

0 comments:

Post a Comment