Wednesday, 8 March 2017

मृत्यू दाखल्यासाठी 2 हजारांची लाच घेणार्या मनपा महिला शिपायास अटक

कोल्हापूर महानगरपालिकेत लाचलुचपत व खाबूगीरी किती फोफावली आहे याचे हे पंधरवड्यातील दुसरे उदाहरण आहे ,
कोल्हापूर महानगरपालिकेच्या रेकॉर्ड विभागातील मृत्यू दाखल्याचे रेकॉर्ड शोधून देण्यासाठी 2 हजारांची लाच घेणार्या लक्ष्मी जीवाजी चव्हाण (वय 58, रा. वारे वसाहत, मंगळवार पेठ) या महिला शिपाईस कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. एका नागरिकाने आपल्या शेती जमिनीचे कोर्टकामाकरता पणजोबा, आजोबा यांच्यासह चार पूर्वजांचे मृत्यू दाखले मिळणेसाठी जानेवारी 2017 रोजी महापालिकेमध्ये रितसर अर्ज सादर केला होता.

याला उत्तर मिळत नसल्याने पंधरा दिवसांत आणखी तीनवेळा अर्ज दिला. या विभागाकडे शिपाई असणार्या लक्ष्मी चव्हाण हिची भेट घेऊन रेकॉर्ड मिळवून देण्याची विनंती केली.
लक्ष्मी चव्हाणने कागदपत्रे शोधण्यासाठी प्रत्येक दाखल्याला 1 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून एकूण 3500 रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने 6 मार्चला चव्हाण यांची भेट घेऊन 2 हजार रुपये देण्याचे कबूल केले. याची माहिती तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागास दिली.
मंगळवारी महापालिका इमारतीतील रेकॉर्डर विभागात लाचेची रक्कम स्वीकारताना शिपाई चव्हाण हिला रंगेहाथ पकडण्यात आले. कारवाईमध्ये पोलिस उपअधीक्षक राजेश गवळी, पद्मा कदम, पोलिस निरीक्षक सुनील वायदंडे, श्रीधर सावंत, मोहन सौंदत्ती, व सहकारी यांनी सहभाग घेतला.
यापुर्वीही एक क्लार्क बिलं मंजुरीसाठी लाच घेताना अटक झाला आहे.

0 comments:

Post a Comment