लक्ष्मण कांबरे दि. २५/६/१७
पंचगंगा नदी पुल व एक मोठे फर्निचर शॉप नजीक गेली तीन वर्षापासून खुलेआम तृतीय पंथीयांची तरुणांना बिघडविणारी अनैसर्गिक कृत्ये सुरू आहेत. मात्र हे बिभित्स दृश्ये पाहून ही कार्यवाही न करता गांधीनगर पोलीस ठाणे व एमआयडीसी पोलीस ठाणे गांधारीच्या भूमिकेत आहेत. हा चर्चेचा विषय बनला आहे. या दोन्ही पोलीस ठाण्याकडून यांना अभय मिळत असल्याने दोन्ही ठिकाणच्या रस्त्यालगत सायंकाळी सात नंतर युवक,तरूण ग्राहकांची रीघ लागलेली दिसून येत आहे. हा बिभित्स तमाशा पाहण्यात सर्वांना स्वारस्य
निर्माण झाले आहे. या समाजविघातक कार्यास प्रतिबंध करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
शिरोली (ता. हातकणंगले ) येथील राष्ट्रीय महामार्ग नजीक उजव्या बाजूला एका फर्निचर मॉल शेजारी व पंचगंगा
पुलाजवळ जुन्या रस्त्यालगत मोकळी जागा आहे. या ठिकाणी अंधार पडल्यानंतर दहा ते पंधरा तृतीयपंथी आकर्षक पाश्चिमात्य तोकडे कपडे परिधान करून चेहरा मेकअपने थापून मॉडेलला लाजवेल असे वेशभूषा करून उभे राहिलेले असतात. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला सोयीच्या रस्त्यावरून प्रवाश्यांची ये- जा सुरू असते. त्यावेळी आपल्या मादक अदाकरीने घायाळ करण्याचे त्यांचे कार्य सुरू असते. अश्लिल खुणवा खुणवी ,हातवारे करून युवक, तरुण यांना बोलविले जाते.
लांब केस, पाश्चिमात्य तोकडे कपडे, जुडीदार, साडी आदी कपडे परिधान करून आकर्षक बांध्यामुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेण्याचे व आकर्षित करण्यासाठी त्यांच्या लिला सुरू असतात.
प्रवासी येथून जात असतांना प्रत्येकांचे लक्ष वेधले जाते. तसेच हे तृथीयपंथी आपल्या स्कूटरवरून या परिसरात रपेट मारीत प्रवाश्यांना भुलविण्याचे कार्य करीत असतात. या ठिकाणी कॉलेज युवक, तरुण प्रवाशी यांच्या बरोबर बोलण्यासाठी सदैव गर्दी करून असतात. या परिसरात रिकाम्या जागी तृथीयपंथ्या सोबत अश्लिल कृत्ये खुलेआम पाहयला मिळतात. दररोज दूरदूरचे युवक, तरुण या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी येऊन हम रस्त्यातच त्यांच्याबरोबर अश्लिलकृत्ये सुरु असलेली पाहयला मिळत आहे.
काही ठिकाणच्या चौपाटीवरील प्रेमी युगुलीचे प्रणयलीला पाहायला मिळतात त्याप्रमाणे त्यांना लाजवतील अशी या ठिकाणी प्रणयदृश्ये राजरोसपणे सुरू आहेत. हा अनैसर्गिक कृत्याचा अड्डा बनला आहे. या ठिकाणाहून अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची वाहने ये जा करतात . मात्र त्यांना येथील तृतीयपंथीयांचा उच्छाद दिसून येत नाही का?हा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे. पोलीस दलाकडनू विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यासाठी दंडात्मक कारवाई सुरू आहे. याच प्रमाणे या ठिकाणी चालणाऱ्या तृतीयपंथींयांचा हा राजरोसपणे तरूईला बिघडविणारा वाममार्गाला लावणारा व्यवसाय सुरू आहे. यावर उपाय योजना पोलीस दलाने करणे गरजेचे बनले आहे.
- पंचगंगा पुलानजीक दर्गा असून हे हिंदू मुस्लिम लोकांचे ऐक्याचे पवित्र स्थळ आहे. मात्र नजीकच अशी वाईट कृत्ये चालतात. त्यामुळे येथील पावित्र्य धोक्यात आले आहे. दुसरे ठिकाणी मोठा फर्निचर मॉल आहे.तसेच येथून सोयीच्या मार्गावरून प्रवाशी आपल्या कुटुंबासाहित प्रवास करीत असतात.तिथे येणाऱ्या महिला, आबाल, वृद्धांना हा लज्जास्पद नंगानाच पाहयला मिळतो. त्यामुळे ते खजिल होत असतात.
काही महिन्यापूर्वी कोल्हापूरमध्ये यांच्या समुहामध्ये गँगवॉर झाला होता. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्या ठिकाणावरून हाकलून लावण्यात आले होते. तेथिलच काहीजण एकत्र येऊन व बाहेरील परिसरात राहण्यासाठी आलेले हे सर्वजण एकत्र येवून समाजास अमान्य कृत्ये करीत आहेत. जिल्ह्यातील वेश्या व्यवसायावर फारमोठी कारवाई झाली आहे. अनेक लॉजवर छापा टाकून या व्यवसायात गुंतलेल्यांना बेड्या घालण्यात यशस्वी झालेले पोलीस दल मात्र या ठिकाणी चाललेल्या कृत्याविरोधी कारवाई का करत नाही,हा संशोधनाचा मुद्दा ठरत आहे. तृतीय पंथीयाच्या या ठिकाणी चालणाऱ्या वाईट कृत्यांच्या विरोधात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांचा अनैसर्गिक अश्लिल कृत्यांचा नंगानाच चालणारा अड्डा उध्वस्त करावा अशी मागणी प्रवाशी व परिसरातील नागरिकांतून होत आहे.
Wednesday, 28 June 2017
Tuesday, 27 June 2017
कोल्हापूर प्रतिनिधी
काल कोल्हापूरहून जोतिबाला दर्शनासाठी दुचाकीवरून एक कुटुंब निघाले होते. सुतार दांपत्य व त्यांची दोन मुले असे दुचाकीवरून जात असताना त्यांचा ताबा सुटला व रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली.
यावेळी धोंडीराम आनंदा सुतार यांनी हेल्मेट परिधान केल्याने त्यांचा जीव वाचला आहे तर पत्नी सावित्री व मुलगा कुश हे जखमी झाले आहेत.
सुतार यांची दुचाकी झाडावर आदळली त्यावेळेस त्यांचे डोके झाडाच्या खोंबार्याला जोरात आदळले व हेल्मेट फोडून खोंबारा डोक्यात घुसला पण त्याची तीव्रता कमी होती अन्यथा डोक्यात आरपार घुसला असता.
फक्त हेल्मेट सक्ती मुळे सुतार यांनी आपल्या मित्राकडून हेल्मेट मागुन घेतले होते तेच त्यांना जीवनदायी ठरले.
घटनास्थळावरून डॉ. अभिजित जाधव यांनी 108 अॅम्ब्युलन्स मधून जखमींना प्रथमोपचार करत त्वरित हॉस्पिटलला दाखल केले व नंतर परतताना या अपघातात फक्त हेल्मेट वापरल्याने एक जीव कसा वाचला हे सांगणारा व्हीडिओ केला
खालील लिंकवर क्लिक करून व्हीडिओ जरूर पहा व शेअर कराच*
https://m.youtube.com/watch?v=XnEmls1Ub54&feature=youtu.be
Monday, 26 June 2017
कोल्हापूर प्रतिनिधी
किणी टोल नाक्यावर टोलगुंडांनी ट्रक चालकाला केलेल्या मारहाणीचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे, यामुळे वाहन चालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे,
जखमी संजय कडवेकर अजूनही शुद्धीवर आला नसून त्याच्यावर कोल्हापूरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, सध्या तो आय सी यु मध्ये आहे, त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असुन त्याच्यावर महाग उपचार परवडणारे नाहीत,
टोल वसुलीचे काम करताना गुंडगिरी करणाऱ्या व केवळ टोलच्या कारणासाठी एका निरपराध व्यक्तीच्या जीवावर उठणाऱ्या टोलगुंडांना आज मात्र पेठ वडगांव पोलिसांनी अटक केली आहे.
1 नितीन बाबुराव सिद्द वय 29 रा. घुणकी.
2 चंदन बाळासो सालपे वय 34 रा. पेठ वडगांव.
3 अमोल भास्कर गायकवाड वय 29 रा. पलुस.
4 अमोल शंकर गावडे वय 28 रा. पेठ नाका, वाळवा.
5 कैलास चुणीलाल खाटीक वय 29 रा. भिलवाडा राजस्थान
याप्रकरणी पुढील तपास पेठ वडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव करत आहेत.
मुरगुड प्रतिनिधी - समीर कटके
कौलगे ता कागल येथे माथेफिरूने केलेल्या हल्ल्यात एक किशोरवयीन युवती गंभीर जखमी झाली. अनिल निवृत्ती कांबळे वय 47 याने शेजारील किशोरी जनार्दन दावणे वय 17 या युवतीवर चाकू हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली. घटना सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घडली. जखमी युवतीस सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुरगुड पोलिसांनी संशयित आरोपी अनिल कांबळे यास ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अनिल निवृत्ती कांबळे यांने शेजारी राहणाऱ्या किशोरी जनार्दन दावणे हिच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. गळा, छाती व पोटावर सात वार करून जखमी केले.
संशयित आरोपी शिक्षक असून गेल्या अनेक वर्षांपासून सेवेत नसल्याचे समजते.घटनेची नोंद करण्याचे काम कोल्हापूर पोलिसांकडून रात्री उशिरा पर्यंत सुरु होते.
फोटो - आरोपी अनिल निवृत्ती कांबळे
कोल्हापूर प्रतिनिधी :
पुणे बेंगलोर हायवेवर किणी टोल नाक्यावर
टोल न देता जाणार्या ट्रक चालकाला येथील नाक्यावर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केली व बेशुद्धावस्थेत तेथे टाकले,
संजय कडवेकर वय 40 रा. जांभळेवाडी जि. सांगली असे चालकाचे नाव आहे.त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनीं सांगितले. ही घटना दि. 24 रोजी दुपारी घडली होती.
यावेळी घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की ट्रक चालक संजय हा कोल्हापूरहून पुण्याकडे माल घेऊन जात असताना किणी टोल नाक्यावर पावती करण्यास वेळ झाला म्हणून त्याची व कर्मचाऱ्यांची शाब्दिक चकमक झाली, यानंतर त्याने ट्रक तसाच पुढे नेण्याचा प्रयत्न केला यावेळी टोलनाक्यावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याला ट्रक बाहेर ओढून नाक्याच्या एका केबीनमध्ये आणले व लोखंडी रोडने आणि मिळेल त्या वस्तूने जबर मारहाण केली व बेशुद्धावस्थेत तेथेच टाकले, ही घटना त्याच्या भावाला समजताच त्याला सीपीआरमध्ये गंभीरावस्थेत दाखल करण्यात आले.
त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनीं आहे.
याबाबत पेठ वडगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपींनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे असे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले.
या प्रकारामुळे टोलनाक्यावर टोलगुंडांची दशहत पुन्हा एकदा उघड झाली असून पोलीस त्याला कसा आळा घालतात ते पाहणे गरजेचे आहे, स्थानिक वाहन चालकांच्या म्हणण्यानुसार टोलनाक्यावर कर्मचारी म्हणून परजिल्हयातील गुंड, पैलवान व गुन्हेगारांचा भरणा आहे, बरेचवेळा हे सहकुटुंब जाणाऱ्या वाहनांना मुद्दाम दमदाटी करतात व दशहत माजवत असतात.
त्यांच्याकडे ओळखपत्रे नसतात व असे कर्मचारी परजिल्हयातील तडीपार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Friday, 23 June 2017
प्रतिनिधी :- कृष्णात हिरवे
जेऊर ता.पन्हाळा येथील रुपाली शिवाजी चिले वय ३५वर्षे या विवाहितेने दिनांक २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.मृत्यूचे कारण अजून समजू शकलेले नाही.
रुपाली चिले यांचे शिवाजी शामराव चिले यांच्या सोबत दुसरा विवाह झाला होता. रुपाली चिले यांना पहिल्या नवऱ्यापासून एक १६ वर्षाची मुलगी, तर शिवाजी चिले यांच्या पासून एक ६ वर्षाचा मुलगा आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली असून, याबाबतचा अधिक तपास पोलीस नाईक व्ही.एम.कोळेकर व पोलीस कॉन्स्टेबल प्रदिप यादव हे करत आहेत..
कोल्हापूरात अंबाबाई मंदिरातील ‘पुजारी हटाओ’ आंदोलन भाविकांनी सुरु केले आहे.
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत गुरुवारी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविण्यात आली होती.
यावेळी अंबाबाईला घागरा चोली नेसवून पूजा बांधल्याने पुजाऱ्यांनी प्रायश्चित करावे यासाठी देवीसमोर दोन दिवस उपवास करावा, असा मुद्दा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुचविला , मात्र आक्रमक आंदोलकांनी त्यास तीव्र विरोध केला नेमके याच वेळी पुजारी अजित ठाणेकर आंदोलकांसमोर हसत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे भडकलेल्या आंदोलकांनी त्यांना आक्षेप घेतला व ठाणेकर यांना बाहेर काढले जावे , अशी मागणी केली. परंतु ठाणेकर यांनी बाहेर जाण्यास नकार दिला. त्यामुळे आंदोलकांनी त्यांना धक्का बुक्की व मारहाण सुरु केली. यावेळी संतप्त महिला आंदोलकांनी ठाणेकरना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. पोलिसांनी हस्तक्षेप करुन ठाणेकर यांना बाहेर काढले व पोलीस गाडीत बसवले.
जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यात अहवाल द्यावा, असा निर्णय चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्यानंतर ही बैठक संपली, पण आंदोलकांचा राग काही कमी झालेला दिसत नाही.
Sunday, 18 June 2017
प्रतिनिधी संदीप पोवार
कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गेल्या सहा महिन्यात झालेल्या सुमारे 60 घरफोड्यांचा छडा शनिवारी लावला
याबाबत पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 50 हुन अधिक घरफोड्या नोव्हेंबर 2016 ते मे अखेर 2017 झाल्या होत्या.या घरफोड्यामुळे नागरीकांमध्ये तर भितीचे वातावरण निर्माण झाले होते पण चोरांना पकडण्यासाठी पोलिस ही रात्र दिवस प्रयत्न करत होते.या चोरांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वेगवेगळी पथके स्थापन केली. पोलीसांनी अशा प्रकारच्या घरफोड्या कोण करतात व हुबेहुब अशाच घरफोड्या जिल्ह्याच्या बाहेर कुठे झाल्या आहेत का याची कसून माहिती घेतली.त्यानुसार हे लोक उस्मानाबाद जिल्ह्यात रहात असून ते अशा प्रकारे चोरी करतात याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे उस्मानाबादमध्ये पोलिसांच्या एका पथकाने इटकूर येथे एका वस्तीवर छापा टाकून संशयित दत्ता काळे, अनिल काळे, रामेश्वर शिंदे व राजेंद्र काळे ( सर्व रहाणार इटकूर,ता.कळंब)यांना ताब्यात घेतल्यावर त्यांच्याकडे 12 चलनी नोटा त्या नोटामध्ये परकीय चलन सुध्दा आढळून आले.आणि 8 हजार किंमतीचे चांदीचे दागिने,86 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने, चाकू, एक पंज, तीन मोबाईल व कॅमेरा असा मुद्देमाल जप्त केला. चोरी केलेले दागिने त्यांनी आसपासच्या सोनारांना विकल्याचे निष्पन्न झाले. कोल्हापूरात देखील चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले.
ह्या कारवाईत पोलिस अधीक्षक संजय मोहिते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संजीव झाडे,उपनिरीक्षक अमोल माळी, युवराज आठरे,शरद माळी, राजेंद्र सानप,सचिन पंडित व इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे. या टोळी कडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
Saturday, 17 June 2017
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी समीर गायकवाडला आज (शनिवार) दि 17 जून 2017 रोजी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. तो 15 सप्टेंबर 2015 पासून अटकेत होता. त्याला आज न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर काही अटी घातल्या व जामीन मंजूर केला.
गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर चौघांनी दोन पिस्तुलातून गोळ्या झाडल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
Friday, 16 June 2017
प्रतिनिधी संदीप पोवार कोल्हापूर
दि.15/6/2017.रोजी बाबर हाॅस्पिटलच्या मागील मोकळ्या मैदानात ऊसने पैसे मागणीवरून मारामारी झाली. पोलीसांकडून अधिक मिळालेल्या माहितीनुसार,
वसीम मेहमूद कुमंदन (वय 26,धंदा - खाजगी प्रशिक्षक,रा.प्लाॅट नं.204,आत्माराम काॅम्लेक्स,न्यु शाहुपूरी,कोल्हापूर) हा दुपारी 2:30 च्या सुमारास बाबर हाॅस्पिटलच्या मागील मोकळ्या मैदानात स्नूकर खेळण्यासाठी गेला असता त्याच्या ओळखीचा अमृत विणु बिडु (रा.स्वामी विवेकानंद काॅलेज जवळ,कोल्हापूर) हा वसीम कुमंदन यांच्याकडे 40000 हजार रुपये ऊसने मागू लागला पण वसीम याने पैसे देण्यास नकार दिला असता अमृत बिडू याने त्यांना लाथाबुक्याने मारहाण करून तेथेच जमिनीवर पडलेला दगड उचलून डोक्यात मारला त्याच झटापटीत वसीम कुमंदन यांची गळ्यातील 2 तोळा असलेली सोन्याची चेन तुटून पडली.तसेच तेथून अमृत बिडू हा पळून जात असताना तुला व तुझ्या कुटुंबीयांना सोडणार नाही अशी धमकी दिली
याची नोंद शाहुपूरी पोलिस ठाण्यात झाली असून भा.द.वि.स.कलम 324,504,506 प्रमाने गुन्हा दाखल केला आहे. तरी अधिक तपास पोलीस नाईक तळपे करीत आहेत.
कोल्हापूर प्रतिनिधी
गेल्या आठवडय़ात हायवेवर दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीचे फर्मान काढण्यात आले, विना हेल्मेट लोकांना 500 रुपये प्रमाणे लाखो रुपये दंड वसूल करण्यात आला आणि कारवाईचे आकडे मिडीयावर प्रसिद्ध करण्यात आले पण हे सर्व पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी व महसूल टार्गेट गोळा करण्यासाठी होते काय? असे नागरिकांतून बोलले जात आहे कारण आमच्या प्रतिनिधीने समक्ष कोल्हापूर सातारा हायवेवर जाऊन याची पडताळणी केली असता वेगळे दृश्य पहायला मिळाले.
शिरोली ते वाठार रस्त्यावर फक्त 10 टक्के दुचाकी स्वारांनी हेल्मेट घातले होते तर सर्रास लोकांना हायवेवर हेल्मेट सक्ती आहे हेच माहीत नाही तसेच ट्रीपल सिट, मोबाईल वर बोलत गाडी चालवणे, रॉंग साईटने गाडी चालवणे असे वाहतूक नियमांचे उल्लंघन पदोपदी दिसले.
यामुळेच नागरिकांच्या बोलणे खरे आहे हे जाणवले की पोलिसांनी हेल्मेट सक्ती केली पण फक्त कागदावरच प्रत्यक्षात अंमलबजावणी शुन्य !
फोटो - कोल्हापूर शिरोली ते वाठार हायवेवर दुचाकीस्वार विनाहेल्मेट वाहतूक नियमांचे उल्लंघन कसे करतात
Thursday, 15 June 2017
.
मुरगूड प्रतिनिधी - समीर कटके
हणबरवाडी ( ता.कागल ) येथून कु.निशिगंधा संभाजी लोखंडे ( मूळ गाव - पेंढारवाडी,ता.आजरा,वय - 22 वर्षे ) ही युवती बेपत्ता झाली आहे.
पेंढारवाडी,ता.आजरा येथील कु.निशिगंधा संभाजी लोखंडे ही हणबरवाडी ( ता.कागल ) येथील आपली आत्या शालन दत्तात्रय फराकटे यांच्याकडे सुट्टीसाठी आली होती.रविवार ता.11रोजी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास आपल्या पेंढारवाडी या गावी जातो असे सांगून घरातून गेली.ती अद्याप घरी परत आलेली नाही.
-----------------------
निशिगंधा संभाजी लोखंडे हीचा फोटो.
मुरगुड प्रतिनिधी - समीर कटके
वीज वितरण कंपनीचे मुरगुड विभागीय कार्यालयातील कर्मचारी विनोद रमेश सुलताने यास हळदी ता कागलच्या सरपंच मंगल गणपती भारमल यांचा मुलगा संतोष गणपती भारमल याने गावातील पथदिवे का बसवत नाही म्हणून शिवीगाळ करत धक्काबुक्की करून मारहाण केली.आज दुपारी 2.30 वाजता ही घटना घडली.
या बाबत अधिक माहिती अशी,हळदी (ता.कागल) येथे मुरगूड विभागीय कार्यालयातील कर्मचारी विनोद रमेश सुलताने ( मूळ गाव गोरेगाव,ता.अकोला) हे गेल्या सहा महिन्यापासून वायरमन म्हणून काम पाहतात.त्यांच्याकडे हळदी,हळदवडे व करंजीवणे या तीन गावांचा चार्ज आहे.भडगाव सबस्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य वाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी आज दुपारी सुलतानेसह वीज वितरण कंपनीचे काही कर्मचारी हळदवडे येथे आले होते.याच दरम्यान हळदी येथील सरपंच पुत्र संतोष भारमल याने विनोद सुलताने यांना फोन करून तू गावातील खांबावरचे बल्ब घालणार आहेस कि नाही.अशी विचारणा केली.यावेळी सुलतानी यांनी आमची मुख्य वाहिनी नादुरुस्त आहे.त्यामुळे आज कांही शक्य होणार नाही.असे सांगितले.त्यावेळी सरपंच पुत्राने सुलताने यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.आणि तू कोठे आहेस अशी विचारणा केली.सुलताने यांनी आपण हळदवडे गावी कापशी रोडवर दुरुस्तीच्या कामात असल्याचे सांगितले.त्यांनतर 2.30 वाजण्याच्या सुमारास संतोष व त्याचे काही सहकारी वाहनाने त्या ठिकाणी आले सुलताने यांच्या अंगावर धावून जात धक्का बुक्की केली व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली.याचवेळी त्यांनी जीवे मारण्याची धमकी देखील दिली.
हि घटना मुरगूड विभागीय कार्यालयात समजताच कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद करून मुरगूड पोलीस ठाण्याकडे धाव घेतली काही मिनिटात स्टेशनचा आवार कर्मचाऱ्यांनी भरून गेला. दुपारपासून हे कर्मचारी व वायरमन विनोद सुलताने या ठिकाणी थांबून होते.पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी तुला मारणारे येऊ देत मग आपण तक्रार दाखल करून घेऊ असे सांगितले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस ठाण्याच्या आवारात हे प्रकरण मिटवण्यासाठी कांही कार्यकर्ते व वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांच्यात चर्चा सुरु होती.वारंवार सुलताने व कंपनीचे अधिकारी आर.एस.चिक्कोडे यांच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव वाढत होता.तर कर्मचारी संघटनेचे कार्यकर्ते मात्र तक्रार मागे घेण्यास तयार नव्हते.त्यामुळे रात्री उशीरापर्यंत तक्रार दाखल झाली नव्हती.
या बाबत मारहाण झालेले कर्मचारी सुलताने म्हणाले " भाकरीच्या निमित्ताने आम्ही अकोल्यातून येथे आलो आहोत बड्या लोकांशी वैर घेऊन काय करू? अजून एक वर्ष प्रशिक्षण कालावधी याच ठिकाणी पूर्ण करावयाचा आहे" असे अगतिकतेने सांगितले. याचवेळी हळदी गावात या पूर्वी बळीराम पाटील, संजय वाडकर व प्रवीण पाटील या कर्मचाऱ्यांना अशाच हल्ल्यांना सामोरे जावे लागले असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.