प्रतिनिधी - संदीप पोवार
वडणगे (ता. करवीर) गावात गेले काही दिवस काही तरुण संशयितरित्या वावरत होते, त्यांनी गावाबाहेरच्या माळावर एक झोपडी उभारली होती . ते एका सराफ दुकानावर दरोडा टाकण्यासाठी मोटारीतून येणार असल्याची माहिती करवीर पोलिस ठाण्याच्या माध्यमातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली येथे पथकाने सापळा रचला. कोल्हापूर ते रत्नागिरी रस्त्यावरील वडणगे फाट्यावरून जाणाऱ्या त्या तवेरा कारवर पाळत ठेऊन होते. मध्यरात्री संबधित गाडी या रस्त्यावरून जाताना त्यांना दिसली. चालकाला गाडी थांबविण्यास त्यांनी सांगितली. त्यानंतर गाडीची झडती घेतली. त्यात एअर पिस्तूल , एअर गन, सत्तूर, तलवारी अशी घातक हत्यारे मिळून आली. त्यांच्यावरील संशय बळावला त्यांच्या सोबत असलेल्या दुसऱ्या मोटारीचीही पोलिसांनी तपासणी केली. त्यात त्यांना राईल पुलरचे साहित्य, पितळेच्या सोन्याचे पाणी दिलेल्या दोन विटा, बिस्कीटे आदी मिळून आले. पोलिसांनी दोन्ही गाडी तील आठ जणांची चौकशी केली. त्यांनी आपली नावे सुधीर येनोळगे, गणेश पाटील, संजयकुमार शर्मा, सुरेंद्र जैसवाल, हरीष शर्मा, वासूराम जैसवार, हवालदार सरोज आणि शशिकुमार शर्मा असल्याचे सांगितले. यातील सुरेंद्र जैसवाल हा डॉक्टर आहे. वडणगे गावातील एका सराफ दुकानावर रात्रीच्या वेळी दरोडा टाकण्याचा बेत होता. यापूर्वी त्यांनी पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून अनेकांना लुटले आहे असे समजते.
0 comments:
Post a Comment