मुरगुड प्रतिनिधी - समीर कटके
वीज वितरण कंपनीचे मुरगुड विभागीय कार्यालयातील कर्मचारी विनोद रमेश सुलताने यास हळदी ता कागलच्या सरपंच मंगल गणपती भारमल यांचा मुलगा संतोष गणपती भारमल याने गावातील पथदिवे का बसवत नाही म्हणून शिवीगाळ करत धक्काबुक्की करून मारहाण केली.आज दुपारी 2.30 वाजता ही घटना घडली.
या बाबत अधिक माहिती अशी,हळदी (ता.कागल) येथे मुरगूड विभागीय कार्यालयातील कर्मचारी विनोद रमेश सुलताने ( मूळ गाव गोरेगाव,ता.अकोला) हे गेल्या सहा महिन्यापासून वायरमन म्हणून काम पाहतात.त्यांच्याकडे हळदी,हळदवडे व करंजीवणे या तीन गावांचा चार्ज आहे.भडगाव सबस्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य वाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी आज दुपारी सुलतानेसह वीज वितरण कंपनीचे काही कर्मचारी हळदवडे येथे आले होते.याच दरम्यान हळदी येथील सरपंच पुत्र संतोष भारमल याने विनोद सुलताने यांना फोन करून तू गावातील खांबावरचे बल्ब घालणार आहेस कि नाही.अशी विचारणा केली.यावेळी सुलतानी यांनी आमची मुख्य वाहिनी नादुरुस्त आहे.त्यामुळे आज कांही शक्य होणार नाही.असे सांगितले.त्यावेळी सरपंच पुत्राने सुलताने यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.आणि तू कोठे आहेस अशी विचारणा केली.सुलताने यांनी आपण हळदवडे गावी कापशी रोडवर दुरुस्तीच्या कामात असल्याचे सांगितले.त्यांनतर 2.30 वाजण्याच्या सुमारास संतोष व त्याचे काही सहकारी वाहनाने त्या ठिकाणी आले सुलताने यांच्या अंगावर धावून जात धक्का बुक्की केली व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली.याचवेळी त्यांनी जीवे मारण्याची धमकी देखील दिली.
हि घटना मुरगूड विभागीय कार्यालयात समजताच कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद करून मुरगूड पोलीस ठाण्याकडे धाव घेतली काही मिनिटात स्टेशनचा आवार कर्मचाऱ्यांनी भरून गेला. दुपारपासून हे कर्मचारी व वायरमन विनोद सुलताने या ठिकाणी थांबून होते.पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी तुला मारणारे येऊ देत मग आपण तक्रार दाखल करून घेऊ असे सांगितले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस ठाण्याच्या आवारात हे प्रकरण मिटवण्यासाठी कांही कार्यकर्ते व वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांच्यात चर्चा सुरु होती.वारंवार सुलताने व कंपनीचे अधिकारी आर.एस.चिक्कोडे यांच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव वाढत होता.तर कर्मचारी संघटनेचे कार्यकर्ते मात्र तक्रार मागे घेण्यास तयार नव्हते.त्यामुळे रात्री उशीरापर्यंत तक्रार दाखल झाली नव्हती.
या बाबत मारहाण झालेले कर्मचारी सुलताने म्हणाले " भाकरीच्या निमित्ताने आम्ही अकोल्यातून येथे आलो आहोत बड्या लोकांशी वैर घेऊन काय करू? अजून एक वर्ष प्रशिक्षण कालावधी याच ठिकाणी पूर्ण करावयाचा आहे" असे अगतिकतेने सांगितले. याचवेळी हळदी गावात या पूर्वी बळीराम पाटील, संजय वाडकर व प्रवीण पाटील या कर्मचाऱ्यांना अशाच हल्ल्यांना सामोरे जावे लागले असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
Thursday, 15 June 2017
- Home
- Unlabelled
- हळदीच्या सरपंचांच्या मुलाची वायरमनला मारहाण.
हळदीच्या सरपंचांच्या मुलाची वायरमनला मारहाण.
Posted By CRIME DIARY
On 00:03
0 comments:
Post a Comment