Friday, 16 June 2017

हायवेवर हेल्मेट सक्ती फक्त दिखावाच ?

कोल्हापूर प्रतिनिधी

गेल्या आठवडय़ात हायवेवर दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीचे फर्मान काढण्यात आले, विना हेल्मेट लोकांना 500 रुपये प्रमाणे लाखो रुपये दंड वसूल करण्यात आला आणि कारवाईचे आकडे मिडीयावर प्रसिद्ध करण्यात आले पण हे सर्व पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी व महसूल टार्गेट गोळा करण्यासाठी होते काय? असे नागरिकांतून बोलले जात आहे कारण आमच्या प्रतिनिधीने समक्ष कोल्हापूर सातारा हायवेवर जाऊन याची पडताळणी केली असता वेगळे दृश्य पहायला मिळाले.
         शिरोली ते वाठार रस्त्यावर फक्त 10 टक्के दुचाकी स्वारांनी हेल्मेट घातले होते तर सर्रास लोकांना हायवेवर हेल्मेट सक्ती आहे हेच माहीत नाही तसेच ट्रीपल सिट, मोबाईल वर बोलत गाडी चालवणे, रॉंग साईटने गाडी चालवणे असे वाहतूक नियमांचे उल्लंघन पदोपदी दिसले.
          यामुळेच नागरिकांच्या बोलणे खरे आहे हे जाणवले की पोलिसांनी हेल्मेट सक्ती केली पण फक्त कागदावरच प्रत्यक्षात अंमलबजावणी शुन्य !

फोटो  - कोल्हापूर शिरोली ते  वाठार हायवेवर दुचाकीस्वार विनाहेल्मेट वाहतूक नियमांचे उल्लंघन कसे करतात


0 comments:

Post a Comment