Friday, 23 June 2017

अंबाबाई पुजारी अजित ठाणेकर यांना महिला आंदोलकांनी चोपले

कोल्हापूरात अंबाबाई मंदिरातील ‘पुजारी हटाओ’ आंदोलन भाविकांनी सुरु केले आहे.
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत गुरुवारी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविण्यात आली होती. 
         यावेळी अंबाबाईला घागरा चोली नेसवून पूजा बांधल्याने पुजाऱ्यांनी प्रायश्चित करावे यासाठी देवीसमोर दोन दिवस उपवास करावा, असा मुद्दा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुचविला , मात्र आक्रमक आंदोलकांनी त्यास  तीव्र विरोध केला नेमके याच वेळी पुजारी अजित ठाणेकर आंदोलकांसमोर हसत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे भडकलेल्या आंदोलकांनी त्यांना आक्षेप घेतला व ठाणेकर यांना बाहेर काढले जावे , अशी मागणी केली. परंतु ठाणेकर यांनी बाहेर जाण्यास नकार दिला. त्यामुळे आंदोलकांनी त्यांना धक्का बुक्की व मारहाण सुरु केली. यावेळी संतप्त महिला आंदोलकांनी ठाणेकरना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. पोलिसांनी हस्तक्षेप करुन ठाणेकर यांना बाहेर काढले व पोलीस गाडीत बसवले.

जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यात अहवाल द्यावा, असा निर्णय चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्यानंतर ही बैठक संपली, पण आंदोलकांचा राग काही कमी झालेला दिसत नाही.

0 comments:

Post a Comment