प्रतिनिधी संदीप पोवार
कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गेल्या सहा महिन्यात झालेल्या सुमारे 60 घरफोड्यांचा छडा शनिवारी लावला
याबाबत पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 50 हुन अधिक घरफोड्या नोव्हेंबर 2016 ते मे अखेर 2017 झाल्या होत्या.या घरफोड्यामुळे नागरीकांमध्ये तर भितीचे वातावरण निर्माण झाले होते पण चोरांना पकडण्यासाठी पोलिस ही रात्र दिवस प्रयत्न करत होते.या चोरांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वेगवेगळी पथके स्थापन केली. पोलीसांनी अशा प्रकारच्या घरफोड्या कोण करतात व हुबेहुब अशाच घरफोड्या जिल्ह्याच्या बाहेर कुठे झाल्या आहेत का याची कसून माहिती घेतली.त्यानुसार हे लोक उस्मानाबाद जिल्ह्यात रहात असून ते अशा प्रकारे चोरी करतात याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे उस्मानाबादमध्ये पोलिसांच्या एका पथकाने इटकूर येथे एका वस्तीवर छापा टाकून संशयित दत्ता काळे, अनिल काळे, रामेश्वर शिंदे व राजेंद्र काळे ( सर्व रहाणार इटकूर,ता.कळंब)यांना ताब्यात घेतल्यावर त्यांच्याकडे 12 चलनी नोटा त्या नोटामध्ये परकीय चलन सुध्दा आढळून आले.आणि 8 हजार किंमतीचे चांदीचे दागिने,86 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने, चाकू, एक पंज, तीन मोबाईल व कॅमेरा असा मुद्देमाल जप्त केला. चोरी केलेले दागिने त्यांनी आसपासच्या सोनारांना विकल्याचे निष्पन्न झाले. कोल्हापूरात देखील चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले.
ह्या कारवाईत पोलिस अधीक्षक संजय मोहिते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संजीव झाडे,उपनिरीक्षक अमोल माळी, युवराज आठरे,शरद माळी, राजेंद्र सानप,सचिन पंडित व इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे. या टोळी कडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
0 comments:
Post a Comment