Tuesday, 27 June 2017

हेल्मेट मुळे वाचले प्राण - डॉ. अभिजीत जाधव यांचा लाईव्ह रिपोर्ट

कोल्हापूर प्रतिनिधी

काल कोल्हापूरहून जोतिबाला दर्शनासाठी दुचाकीवरून एक कुटुंब निघाले होते. सुतार दांपत्य व त्यांची दोन मुले असे दुचाकीवरून जात असताना त्यांचा ताबा सुटला व रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली.
            यावेळी धोंडीराम आनंदा सुतार यांनी हेल्मेट परिधान केल्याने त्यांचा जीव वाचला आहे तर पत्नी सावित्री व मुलगा कुश हे जखमी झाले आहेत.
         सुतार यांची दुचाकी झाडावर आदळली त्यावेळेस त्यांचे डोके झाडाच्या खोंबार्याला जोरात आदळले व हेल्मेट फोडून खोंबारा डोक्यात घुसला पण त्याची तीव्रता कमी होती अन्यथा डोक्यात आरपार घुसला असता.
           फक्त हेल्मेट सक्ती मुळे सुतार यांनी आपल्या मित्राकडून हेल्मेट मागुन घेतले होते तेच त्यांना जीवनदायी ठरले.
        घटनास्थळावरून डॉ. अभिजित जाधव यांनी 108 अ‍ॅम्ब्युलन्स मधून जखमींना प्रथमोपचार करत त्वरित हॉस्पिटलला दाखल केले व नंतर परतताना या अपघातात फक्त हेल्मेट वापरल्याने एक जीव कसा वाचला हे सांगणारा व्हीडिओ केला
खालील लिंकवर क्लिक करून व्हीडिओ जरूर पहा व शेअर कराच*

https://m.youtube.com/watch?v=XnEmls1Ub54&feature=youtu.be

0 comments:

Post a Comment