प्रतिनिधी - संदीप पोवार
रात्री 10.00 च्या सुमारास रुईकर काॅलनी कडून नीता ट्रॅव्हल बस क्रमांक MH 09 CV 7003 व हिरो होंडा स्पेंडर गाडी क्रमांक KA 24 R 8744 ही एकाच दिशेने कावळा नाका येथे आल्या असता स्पेंडर गाडी चालवत असलेल्या दोन युवकांनी नीता ट्रॅव्हलच्या बसला ओव्हरटेक करत असताना त्यांचा धक्का ट्रॅव्हलच्या डाव्या बाजूला लागल्यामुळे स्पेंडर गाडीवरील युवक शिवू ( मुळ गाव विजापूर सध्या निगडेवाडी) हा चाकाखाली सापडून जागीच ठार झाला व दुसरा युवक गौस (मळ गाव बेळगाव) हा गंभीररित्या जखमी झाला. हा प्रकार चालकाला समजताच त्याने नागरिकांचा जमाव पाहून ट्रॅव्हल सोडून पलायन केले त्यामुळे नागरीकांनी ट्रॅव्हल बसवर दगडफेक करून काचा फोडल्या व मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
या घटनेची नोंद शाहुपूरी पोलिस ठाण्यात झाली असून बस ड्रायव्हरला ताब्यात घेतले व रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते.
या युवकांनी जर हेल्मेट घातले असते तर हा बळी गेला नसता अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती यावरून फक्त हायवेवरच नाही तर शहरातसुद्धा दुचाकीचालकांनी हेल्मेट वापरावे असा विचार होत आहे.
0 comments:
Post a Comment