Monday, 26 June 2017

माथेफिरूच्या चाकु हल्ल्यात युवती गंभीर जखमी

मुरगुड प्रतिनिधी - समीर कटके

       कौलगे ता कागल येथे माथेफिरूने केलेल्या हल्ल्यात एक किशोरवयीन युवती गंभीर जखमी झाली. अनिल निवृत्ती कांबळे वय 47 याने शेजारील किशोरी जनार्दन दावणे वय 17 या युवतीवर चाकू हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली. घटना सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घडली. जखमी युवतीस सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुरगुड पोलिसांनी संशयित  आरोपी अनिल कांबळे यास ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
         घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अनिल निवृत्ती कांबळे यांने शेजारी राहणाऱ्या किशोरी जनार्दन दावणे हिच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. गळा, छाती व पोटावर सात वार करून जखमी केले.
संशयित आरोपी शिक्षक असून गेल्या अनेक वर्षांपासून सेवेत नसल्याचे समजते.घटनेची नोंद करण्याचे काम कोल्हापूर पोलिसांकडून रात्री उशिरा पर्यंत सुरु होते.

फोटो - आरोपी अनिल निवृत्ती कांबळे

0 comments:

Post a Comment