दुपारी नेहमीप्रमाणे क्राईम डायरी रिपोर्टर संदीप पोवार हे वार्तांकनासाठी शाहूपुरी पोलीस स्टेशनला गेले असता , एक रिक्षावाला एका लहान मुलाला घेउन आला व कोणा प्रवाशाचे मुल रिक्षात विसरले असे सांगु लागला , या बाबतची सविस्तर हकिकत अशी कि , दुपारी दीड ते दोनच्या सुमारास एक दांपत्य स्वस्तिक लॉज , गोकुळ हॉटेल जवळुन भवानी मंडप येथे जाण्यासाठी रिक्षात बसले , त्यांच्यासोबत लहान मुलगाही (अंदाजे वय ४ वर्ष ) होता , हे दांपत्य भवानी मंडपाजवळ उतरले पण मुलगा झोपेत असल्याने रिक्षात मागिल सिटवरच राहिला , नेमके याचवेळेस रिक्षावाल्याची नमाजची वेळ झाली व तो रिक्षा घेउन मलबार हॉटेल रिक्षास्टॉपला गेला , तेथे पोहोचल्यावर ईतर रिक्षा चालकांनी लक्ष्य गेले असता त्याला विचारले , रिक्षात झोपलेला मुलगा कोण ?
मग त्याच्या लक्ष्यात आल्यावर त्याने जवळचेच शाहूपुरी पोलीस स्टेशन गाठले व पोलीसांना सदर हकिकत सांगितली , हा प्रकार भवानी मंडपात घडल्याने शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी रिपोर्टर संदीप पोवार यांच्या मदतीने मुलास जुना राजवाडा पोलीस स्टेशनला पाठवले , संदीप यांनी हातातले काम सोडुन लहानग्यासाठी मानवतेच्या भावनेतुन धाव घेत तेथे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांची भेट घेऊन संदीप पोवार यांनी मुलाला जुना राजवाडा पोलीसांच्या ताब्यात दिले व पालकांचा शोध घेण्यासाठी मदत केली ,
इकडे दांपत्याचे आपला मुलगी हरवल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी जवळचे लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन गाठले , तोपर्यंत सर्वत्र वायरलेसवरुन मेसेज गेल्याने त्यांना मुलगा जुना राजवाडा पोलीसात असल्याचे समजले , त्यांनी त्वरित धाव घेत मुलाची ओळख पटवुन मुलाला ताब्यात घेतले ,
विजय चव्हाण व सुनिता विजय चव्हाण रा राजेश मोटर्सजवळ नामक दांपत्याने मुलगा मिळाल्यावर क्राईम डायरीचे रिपोर्टर संदीप पोवार यांचे अंत:करणातुन आभार मानले तसेच रिक्शाचालक , शाहूपुरी व राजवाडा पोलीसांनी समन्वयाने काम करुन पालकांची भेट घडवल्याबद्दल त्यांचेही आभार मानले
आई व लेकरांची भेट घडवण्यास मदत करणार्या संदीप पोवार यांची बातमी स्थानिक एसपीएन न्युजला पाहिल्यावर त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे !
0 comments:
Post a Comment