Saturday, 18 February 2017

बेशिस्त पार्किंगला लागणार चाप , कोल्हापूर वाहतूक नियंत्रणकडे टोईंग क्रेन दाखल

प्रतिनिधि - सर्जेराव पोवार

कोल्हापूर जिल्हा हा प्रामुख्याने विविध प्रकारच्या बाजारपेठ, धार्मिक व पर्यटनाने प्रसिद्ध आहे. कोल्हापूर शहरात श्री महालक्ष्मी देवीचे दर्शनाकरीता भाविक आप आपल्या चारचाकी वाहनाने येत असतात. त्यामुळे कोल्हापूर शहरात वाहनाची संख्या वाढलेली आहे. सध्या प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर यांचे कडे १२३२४८१ वाहने नोंद झालेली आहेत.
कोल्हापूर शहराचा विस्तार झपाट्याने होत असून रस्त्यांची घनता कमी आहे. रस्ते अरुंद व पार्किंग ची सोय उपलब्ध नसलेने. वाहनधारकांकडून वाहने रस्त्यावर पार्क केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. वाहनधारकांना शिस्त निर्माण होण्यासाठी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आज दि १८/०२/२०१७ रोजी मा श्री विश्वास नांगरे पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक सो, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर, मा. श्री एम बी तांबडे, पोलीस अधीक्षक सो, कोल्हापूर, मा श्री. सुहेल शर्मा, अपर पोलीस अधीक्षक सो,कोल्हापूर याचे उपस्थित एक हायड्रॉलिक क्रेन ( टोईंग क्रेन) चे अनावरण शहर वाहतूक नियंत्रण शाखा, कोल्हापूर करीत केले. या क्रेनद्वारे बेशिस्त पार्क केलेली व रहदारीला अडथळा करणारी वाहने ओढुन नेउन वाहतूक नियंत्रण कक्षाकडे जमा केली जातील व त्यांना दंड ठोठवला जाईल
या वेळी श्री अशोक धुमाळ, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, कोल्हापूर व पोलीस कर्मचारी हे उपस्थित होते.

0 comments:

Post a Comment