काल बुधवारी रात्री ड्युटीवर भिवंडी डेपोमध्ये बस नेत असताना प्रवेशद्वाजवळ रिक्षा उभी होती. त्यावेळी
एसटी बसचालक प्रभाकर गायकवाड यांनी रिक्षा चालकाला रिक्षा हटवण्यास सांगितलं. रिक्षाचालकाने त्यांना न जुमानता रिक्षा हलवली नाही. त्यावेळी एसटी आत नेताना रिक्षाला बसचा धक्का लागला.
याच रागातून रिक्षाचालकाने गायकवाड यांना जाब विचारला. दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली आणि आजुबाजुचे रिक्षाचालकही मदतीला आले. सर्व रिक्षाचालकांनी एसटी चालक प्रभाकर गायकवाड यांना बेदम मारहाण केली.
या घटनेची तक्रार करण्यासाठी गायकवाड पोलिस स्थानकात गेले असता तिथेच चक्कर येऊन कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालय दाखल करण्यात आलं, मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ भिवंडीमध्ये बसचालकांनी संप पुकारला आहे.
या निमित्ताने पुन्हा एकदा रिक्षाचालकांची मुजोरी बाहेर आली आहे. या घटनेची निजामपूर पोलीस स्थानकात तक्रार करून सुद्धा संबंधीत रिक्षाचालकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही याच्या निषेधार्थ आज बसचालक वाहक यांच्याकडून बंद पाळण्यात येत आहे.
0 comments:
Post a Comment