भिवंडीत महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने राजकीय वैरही उफाळून आले असून विरोधी गटाच्या हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून रिव्हाल्वरमधून गोळ्या झाडल्याने या हल्यात काँग्रेसचे पालिका सभागृह नेते ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. मनोज अनंत म्हात्रे (५३ मुळ रा. कालवार ) असे गोळीबारात ठार झालेल्या सभागृह नेत्याचे नांव आहे.रामनगर येथील समर्थक उमाशंकर उर्फ मुलायम यादव यांना विरोधकांनी धमकावल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी यासाठी म्हात्रे नारपोली पोलीस ठाण्यात गेले होते.तेथून ते ओसवालवाडी येथील राहत्या घरी आले असता दबा धरून बसलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने कोयत्याने हात तोडून रिव्हॉल्वरने तीन गोळ्या झाडण्यात आल्या. यातील दोन गोळ्या वर्मी लागल्याने ते जागीच कोसळले. या घटनेनंतर त्यांना तातडीने ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राण ज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यापूर्वीही म्हात्रेंवर कामतघर येथे गोळीबार झाल्याची घटना घडली होती.
Wednesday, 15 February 2017
- Home
- Unlabelled
- भिवंडीत गोळीबारात काँग्रेस पालिका सभागृह नेता ठार
भिवंडीत गोळीबारात काँग्रेस पालिका सभागृह नेता ठार
Posted By CRIME DIARY
On 15:48
0 comments:
Post a Comment