Friday, 10 February 2017

कोल्हापूर कारंडे मळा परिसरात अवैधरित्या गॅस भरताना स्फोट तीन जखमी

क्राईम डायरी प्रतिनिधी संदीप पोवार , सर्जेराव पोवार 

कोल्हापूर येथील कारंडे मळा परिसरात दुपारच्या सुमारास  छोट्या सिलेंडर टाकीत  अवैधरित्या गॅस भरताना स्फोट झाला आहे . या स्फोटात  तीन जखमी झाले आहेत . जखमींची नावे शशिराम तोलाराम आहुजा ( वय ५५ ) , सनी शशिराम आहुजा ( वय २६ ) दोघे राहणार आहुजा हाऊस , कारंडे मळा व कामगार दत्तू बापू गुरव रा . बहिरेश्वर अशी आहेत . या स्फोटाची गोपनीय माहिती मिळाल्यावर शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता त्यांना अर्धवट जळालेल्या गॅस सिलेंडरच्या छोट्या टाक्यांचा साठा वाहनाच्या डिकीमध्ये लपवल्याचे आढळून आले . जखमी हे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून त्याच्यावर शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे , या प्रकरणाचा  सहायक पोलीस निरीक्षक विद्या जाधव अधिक तपास करत आहेत 

0 comments:

Post a Comment